सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 04:47 PM2019-06-29T16:47:17+5:302019-06-29T16:47:39+5:30

यापुढे माझा पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक सुद्धा बदलेले असल्याचे सुषमा म्हणाल्या.

 Sushma Swaraj Left official residence | सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती

सुषमा स्वराज यांनी सोडलं शासकीय निवासस्थान; ट्वीटरवरून दिली माहिती

Next

नवी दिल्ली - भाजपच्या जेष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आपले शासकीय निवासस्थान खाली केले आहे. या बाबतची माहिती त्यांनी स्वतः आपल्या ट्वीटर हँडलवरून दिली आहे. तर यापुढे माझा पत्ता आणि दुरध्वनी क्रमांक सुद्धा बदलले असल्याचे सुषमा म्हणाल्या. सुषमा यांच्या निर्णयावरून सोशल मीडियातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं सुषमा स्वराज यांनी जाहीर केले होते. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत सुषमा यांनी पक्षाच्या आग्रहानंतर ही निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांच्या जागी जयशंकर प्रसाद यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. आता सुषमा यांनी आपले शासकिय निवासस्थानसुद्धा सोडलं आहे. सुषमा स्वराज यांनी ट्वीट करत हा निर्णय जाहीर केला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, ‘मी माझे अधिकृत शासकिय निवासस्थान सोडलं आहे. मी आता उथून पुढे 8 सफरदरजंग मार्ग, नवी दिल्ली या निवासस्थानी उपलब्ध नसणार आहे. माझा पत्ता आणि दुरध्वनी  क्रमांक बदलले आहेत’.

नव्या सरकारच्या कामात अडथळा येऊ नये, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या टीममधील काही अनुभवी व जुन्या चेहऱ्यांना कायम ठेवण्याच्या विचारात करतील, त्यामुळे सुषमा स्वराज यांचा समावेश होईल अशी चर्चा झाली होती. प्रत्यक्षात मात्र त्यांना मोदींच्या मंत्रिमंडळमध्ये स्थान देण्यात आले नाही. त्यांनतर त्यांना आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती झाल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं होत.


 


 


 

Web Title:  Sushma Swaraj Left official residence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.