कथुआ प्रकरण- सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे खटला केला वर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2018 04:20 PM2018-05-07T16:20:17+5:302018-05-07T16:20:17+5:30

कथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा खटला सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे वर्ग केला आहे

Supreme Court transfers Kathua gangrape case to Pathankot, says 'no' to CBI probe | कथुआ प्रकरण- सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे खटला केला वर्ग

कथुआ प्रकरण- सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे खटला केला वर्ग

नवी दिल्ली- संपूर्ण देशाला हादरवून सोडणाराकथुआ सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणाचा खटला सुप्रीम कोर्टाने पठाणकोट कोर्टाकडे वर्ग केला आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता 9 जुलै रोजी होणार आहे. सोमवारी (ता. 7 मे) सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला. पीडित मुलीच्या वडिलांनी हा खटला चंदीगड कोर्टात हलवण्याची मागणी केली होती. तसंच आरोपींनीही याचिका दाखल करुन हा खटला पोलिसांकडून सीबीआयकडे  वर्ग करण्याची मागणी केली होती. पण सुप्रीम कोर्टाने प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी फेटाळली आहे. 

पठाणकोट कोर्टात या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जम्मू-काश्मीर सरकारला सरकारी वकील नियुक्त करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसंच पीडितेच्या कुटुंबाला, वकिलांना आणि पुराव्यांना संरक्षण पुरविण्याचे आदेश दिले आहेत. खटला पठाणकोट कोर्टात वर्ग करण्यापूर्वी कोर्टाने उधमपूर, जम्मू, रामबनसह अनेक जागांचा विचार केला होता. पण पीडितेचं कुटुंबीय रामबनशिवाय इतर जागेसाठी तयार नव्हतं. 

सोमवारी सुप्रीम कोर्टाने कथुआ सामूहित बलात्कार व हत्या प्रकरण पठाणकोट कोर्टात वर्ग करण्याचा  निर्णय दिला. तसंच प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यासंदर्भातील याचिका कोर्टाने रद्द केल्या. 
 

Web Title: Supreme Court transfers Kathua gangrape case to Pathankot, says 'no' to CBI probe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.