सुपरफास्ट रेल्वे प्रवास; दिल्ली-चंदिगढ केवळ 3 तासांमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 07:37 PM2018-08-17T19:37:00+5:302018-08-17T19:38:33+5:30

या प्रवासाचा फक्त वेळच कमी झाला नसून रेल्वे प्रवाशांना विमानासारख्या सोयी मिळणार आहेत. या मार्गावर तेजस एक्सप्रेस धावणार असून लवकरच दिल्लीकरांना शेजारच्या राज्यात जाण्यासाठी या सुपरफास्ट ट्रेनचा लाभ मिळणार आहे.

Superfast train travel; Delhi-Chandigarh only in 3 hours | सुपरफास्ट रेल्वे प्रवास; दिल्ली-चंदिगढ केवळ 3 तासांमध्ये

सुपरफास्ट रेल्वे प्रवास; दिल्ली-चंदिगढ केवळ 3 तासांमध्ये

Next

नवी दिल्ली- देशाची राजधानी नवी दिल्ली आणि पंजाब-हरियाणा राज्यांची राजधानी चंदिगढ यांच्यामधील प्रवास आता केवळ 3 तासांवर येणार आहे. या प्रवासाचा फक्त वेळच कमी झाला नसून रेल्वे प्रवाशांना विमानासारख्या सोयी मिळणार आहेत. या मार्गावर तेजस एक्सप्रेस धावणार असून लवकरच दिल्लीकरांना शेजारच्या राज्यात जाण्यासाठी या सुपरफास्ट ट्रेनचा लाभ मिळणार आहे. मुंबई-गोवा, दिल्ली- चंदिगढ आणि दिल्ली- लखनौ असे तीन मार्ग तेजस एक्स्प्रेससाठी निश्चित करण्यात आले होते. त्यातील मुंबई-गोवा मार्गावरील सेवा गेल्याच वर्षी सुरु झाली आहे.
या तेजस एक्स्प्रेसचे डबे कपूरथळा येथील कारखान्यामध्ये तयार झाले आहेत. ट्रेन नंबर 22425 बुधवार वगळता रोज सकाळी 6.30 वाजता दिल्लीमधून सुटेल आणि सकाळी 9.30 वाजता चंदिगढमध्ये पोहोचेल.  संध्याकाळी ट्रेन नंबर 22426 चंदिगढमधून 5 वाजून 55 मिनिटांनी सुटेल आणि रात्री 8.55 वाजता दिल्लीमध्ये पोहोचेल. चंदिगढमध्ये केवळ एका दिवसाचे काम करून येण्यासाठी या ट्रेनचा उपयोग करता येईल.

दिल्ली- चंदिगढ तेजस एक्स्प्रेसमधील सोयी
1) वायफाय सुविधा
2) मोबाईल आणि युएसबी पॉइंट्स
3) मोड्युलर बायो वॅक्युम शौचालये
4) आरामशीर खुर्च्या
5) मिनी पँट्री- सूप, चहा, कॉफी यांची सोय
6) एलइडी लायटिंग, सीसीटीव्ही सोय,

Web Title: Superfast train travel; Delhi-Chandigarh only in 3 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.