सुनंदा मोकाशीचा संघर्ष सुरू
By Admin | Updated: December 12, 2014 23:49 IST2014-12-12T23:49:17+5:302014-12-12T23:49:17+5:30
नागपूर : ७० वर्ष वयाची सुनंदा मोकाशी ही निराधार म्हातारी सरकारकडून न्याय मागण्यासाठी धरण्यावर बसली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या मोकाशी यांच्या मुंबई येथील घराची पडझड झाली आहे. अर्ज करूनही त्यांना रेशन कार्ड उपलब्ध झाले नाही. निराधाराचे मानधन त्यांना मिळत नाही. या मागण्यांसाठी त्यांना सरकारच्या गृहनिर्माण, अन्न व पुरवठा आणि मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे. त्यांचे हे २२ वे आंदोलन असून, यावर्षी फडणवीस यांचे सरकार आपल्या मागण्या पूर्ण करील, अशी त्यांची अपेक्षा आहे. आपल्याला सरकारच्या मंत्र्याला पोलीस अधिकारी भेटू देत नाही, अशी तक्रार त्यांनी पत्रपरिषदेतून केली.

सुनंदा मोकाशीचा संघर्ष सुरू
न गपूर : ७० वर्ष वयाची सुनंदा मोकाशी ही निराधार म्हातारी सरकारकडून न्याय मागण्यासाठी धरण्यावर बसली आहे. मुंबई येथे राहणाऱ्या मोकाशी यांच्या मुंबई येथील घराची पडझड झाली आहे. अर्ज करूनही त्यांना रेशन कार्ड उपलब्ध झाले नाही. निराधाराचे मानधन त्यांना मिळत नाही. या मागण्यांसाठी त्यांना सरकारच्या गृहनिर्माण, अन्न व पुरवठा आणि मुख्यमंत्र्यांना भेटायचे आहे. त्यांचे हे २२ वे आंदोलन असून, यावर्षी फडणवीस यांचे सरकार आपल्या मागण्या पूर्ण करील, अशी त्यांची अपेक्षा आहे. आपल्याला सरकारच्या मंत्र्याला पोलीस अधिकारी भेटू देत नाही, अशी तक्रार त्यांनी पत्रपरिषदेतून केली.