स्टिल चोरले.... जोड
By Admin | Updated: March 6, 2015 23:07 IST2015-03-06T23:07:26+5:302015-03-06T23:07:26+5:30
ब्राम्हणी-घोडेगावची टोळी

स्टिल चोरले.... जोड
ब राम्हणी-घोडेगावची टोळीट्रकचालक, दुचाकी चालकांना घाटामध्ये लुटणारी टोळी ही ब्राम्हणी (ता. राहुरी) आणि घोडेगाव (ता. नेवासा) येथील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील तिघांची नावे पोलिसांना निष्पन्न झाली आहेत. ते तिघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांनाही लवकरच अटक होईल, असा विश्वास उपअधीक्षक पाटील यांनी व्यक्त केला आहे. गुरुवारी अटक करण्यात आलेले दोघेजण हे शनिशिंगणापूर येथील एका प्रतिष्ठित फुलाच्या दुकानावर काम करीत असल्याची माहिती आहे. दोघांवर दरोडे,रस्ता लुटीचे अनेक गुन्हे आहेत. यातील एकाने रस्ता लूट करणारी टोळी तयार केली असल्याचे पाटील यांनी सांगितले. नऊपैकी दोघे जण हाती लागले असून सातजण अद्याप फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.