3 हजार कोटी खर्च करुन उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला बसला पावसाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2019 02:05 PM2019-06-29T14:05:43+5:302019-06-29T14:09:09+5:30

प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच हा पुतळा आहे.

Statue of Unity's viewing gallery flooded due to heavy rain in Gujarat. | 3 हजार कोटी खर्च करुन उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला बसला पावसाचा फटका

3 हजार कोटी खर्च करुन उभारलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला बसला पावसाचा फटका

Next

वडोदरा - गुजरातमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका जगातील सर्वात उंच असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटीला बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार पुतळ्याच्या 150 मीटर उंचीवर असलेल्या प्रेक्षक गॅलरीत पावसाचं पाणी साचल्याची माहिती आहे.  

प्रेक्षक गॅलरीमध्ये पावसाचं पाणी शिरल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंच हा पुतळा आहे. प्रेक्षकांना उंचावरुन नर्मदा नदीवरील धरण पाहता यावं यासाठी ही गॅलरी बनविण्यात आली होती. मात्र पहिल्या पावसात असा फटका बसल्याने पुतळ्याच्या नियोजनाचा अभाव असल्याचं चित्र दिसून येत आहे. 

वादळी वारा आणि पावसाचं पाणी यामुळे स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या प्रेक्षक गॅलरीत पाणी भरल्याची माहिती आहे. 200 पर्यटकांची क्षमता असलेल्या या गॅलरीत पाणी भरल्याने चिंता व्यक्त केली जातेय. व्यवस्थापन टीमकडून पाण्याचा निचरा करण्यात येत आहे मात्र अशाप्रकारे पहिल्याच पावसात प्रेक्षक गॅलरीत पाणी भरल्याची घटना घडली आहे. 


सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात उंच 182 मीटर उंचीच्या पुतळ्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते  31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण झालं होतं. मात्र या पुतळ्याची प्रवेश फी ही जगप्रसिद्ध ताहमहलच्या प्रवेश फीपेक्षा सातपट अधिक महाग असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत होती. तरीही येथे भेट देणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढत होते. केवळ गुजरातच नाही तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामधूनही येथे पर्यटक येत असतात. 

Image result for statue of unity

या पुतळ्यासाठी 2,989 कोटींचा खर्च आला आहे. लॉर्सन एन्ड टुब्रो आणि राज्य सरकार संचलित सरदार सरोवर नर्मदा निगम लिमिटेडवर पुतळा उभारणीची जबाबदारी होती. स्टॅच्यू ऑफ युनिटी' हा जगातील सर्वात उंच पुतळा असून तो कमी वेळेत तयार करण्यात आला आहे. पुतळ्याची उंची ही न्यूयॉर्कच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच चीनमधील गौतम बुद्धांच्या स्प्रिंग टेंपल येथील पुतळ्यापेक्षाही उंच आहे. तसेच या पुतळ्याचा देखभाल करण्यासाठी दिवसाला 12 लाख रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती आहे. 

Image result for statue of unity

Web Title: Statue of Unity's viewing gallery flooded due to heavy rain in Gujarat.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.