'...तर मी सनी देओल यांना गुरुदासपूरमधून लढू दिले नसते'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 05:23 AM2019-05-13T05:23:51+5:302019-05-13T05:24:33+5:30

पंजाबमधील गुरुदासपूरमधून सनी देओल भाजपतर्फे रिंगणात उतरले आहेत.

'... so I would not have allowed Sunny Deol to fight in Gurdaspur.' | '...तर मी सनी देओल यांना गुरुदासपूरमधून लढू दिले नसते'

'...तर मी सनी देओल यांना गुरुदासपूरमधून लढू दिले नसते'

Next

गुरुदासपूर : काँग्रेसचे दिवंगत नेते बलराम जाखड यांचे पुत्र सुनील जाखड उभे राहाणार हे आधी माहीत असते तर सनी देओल यांना गुरुदासपूरमधून मी निवडणूक लढवूच दिली नसती असे त्यांचे पिता व अभिनेता धर्मेंद्र यांनी म्हटले आहे.

पंजाबमधील गुरुदासपूरमधून सनी देओल भाजपतर्फे रिंगणात उतरले आहेत. इथे २०१७मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड निवडून आले होते. यंदा निवडणुकांत ते पुन्हा नशीब अजमावत आहेत. धमेंद्र म्हणाले की, बलराम यांच्याशी माझे चांगले संबंध होते. त्यांच्या मुलाविरोधात सनी निवडणूक लढवत आहे हे मला नंतर कळले. सुनील मला मुलासारखे आहेत.

२००४च्या लोकसभा निवडणुकांत राजस्थानमधील चुरू मतदारसंघातून बलराम जाखड यांच्या विरोधात निवडणूक लढविण्यास मी नकार दिला होता.

Web Title: '... so I would not have allowed Sunny Deol to fight in Gurdaspur.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.