एकदा B1/B2 व्हिसावरील प्रवास रद्द केल्यास पुढच्यावेळी नव्यानं अर्ज करावा लागतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2019 01:35 PM2019-12-21T13:35:08+5:302019-12-21T13:35:34+5:30

जवळपास सर्व बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसा 10 वर्षांपर्यंत वैध असतात.

Should I apply for new b1 b2 visa if I once cancelled my trip to usa  | एकदा B1/B2 व्हिसावरील प्रवास रद्द केल्यास पुढच्यावेळी नव्यानं अर्ज करावा लागतो का?

एकदा B1/B2 व्हिसावरील प्रवास रद्द केल्यास पुढच्यावेळी नव्यानं अर्ज करावा लागतो का?

Next

प्रश्न- माझ्या कुटुंबाला गेल्या महिन्यात बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसा मिळाला. मात्र काही कारणांमुळे आम्हाला प्रवास करता आला नाही. आम्हाला पुढील काही वर्षांत लॉस अँजेलिसला सुट्टीसाठी जायचे असल्यास नव्या व्हिसासाठी अर्ज करावा लागेल का?

उत्तर- नाही. तुमच्या कुटुंबाकडे असलेल्या व्हिसाची मुदत संपुष्टात येईपर्यंत आणि तुमच्याकडे असलेला व्हिसा तुमच्या प्रवासाच्या प्रकारासाठी योग्य असेपर्यंत तुम्हाला नव्या व्हिसासाठी अर्ज करावा लागणार नाही. 

जवळपास सर्व बिझनेस/टुरिस्ट (B1/B2) व्हिसा 10 वर्षांपर्यंत वैध असतात. तुम्ही वैध व्हिसाच्या आधारे अमेरिकेत वारंवार प्रवास करू शकतात. कुटुंबाची भेट घेण्यासाठी, परिषदेत सहभागी होण्यासाठी, वैद्यकीय कारणांसाठी B1/B2 व्हिसाचा वापर केला जाऊ शकतो. त्याबद्दलची अधिक माहिती https://www.ustraveldocs.com/in/in-niv-typeb1b2.asp या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

तुमच्या व्हिसावर त्याची मुदत कधी संपते याबद्दलची तारीख नमूद केलेली असते. त्या तारखेपर्यंत तुम्ही अमेरिकेत प्रवेश करू शकता. अमेरिकेत प्रवेश करताना प्रत्येकवेळी सीमा सुरक्षा अधिकारी तुम्हाला देशात किती काळ राहण्याची परवानगी आहे हे निश्चित करतात.

तुम्ही अमेरिकेत येणार असाल आणि त्याआधीच तुमच्या व्हिसाची मुदत संपणार असल्याचं तुमच्या लक्षात आल्यास तुम्ही नव्या व्हिसासाठी अर्ज करायला हवा. नव्या व्हिसासाठी अर्ज करताना सध्याच्या व्हिसाची मुदत संपण्याची वाट पाहू नका. तुम्ही तुमच्या सोयीप्रमाणे व्हिसाचे नूतनीकरण करू शकता. तुमचा सध्याचा व्हिसा वैध असल्यास किंवा त्याची मुदत मागील 12 महिन्यांत संपली असल्यास तुम्ही व्हिसा अर्ज केंद्रात ड्रॉप-ऑफ अपॉईंटमेंटसाठी अर्ज करू शकता. यानंतर पासपोर्ट जमा करुन तुम्ही दुतावासातील मुलाखतीशिवाय व्हिसाचं नूतनीकरण करू शकता. या प्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या गोष्टींची माहिती तुम्हाला  http://www.ustraveldocs.com/in/in-niv-visarenew.asp वर मिळेल.

Web Title: Should I apply for new b1 b2 visa if I once cancelled my trip to usa 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.