अल्पमुदतीच्या शेतीकर्जांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 06:49 AM2020-06-02T06:49:54+5:302020-06-02T06:50:16+5:30

ज्या शेतकऱ्यांच्या अशा कर्जाच्या परतफेडीची रक्कम यंदाच्या १ मार्चपासून नंतर देय झाली असेल त्यांना ही परतफेड आता ३१ आॅगस्टपर्यंत करता येईल.

Short-term agricultural loans extended till the end of August | अल्पमुदतीच्या शेतीकर्जांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ

अल्पमुदतीच्या शेतीकर्जांना ऑगस्टअखेरपर्यंत मुदतवाढ

Next

नवी दिल्ली : देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांनी शेतीसाठी आणि शेतीशी संबंधित अन्य कामांसाठी बँकांकडून घेतलेल्या तीन लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या शेतीकर्जांच्या परतफेडीची मुदत येत्या ३१ आॅगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने सोमवारी घेतला.

यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या अशा कर्जाच्या परतफेडीची रक्कम यंदाच्या १ मार्चपासून नंतर देय झाली असेल त्यांना ही परतफेड आता ३१ आॅगस्टपर्यंत करता येईल. ही कर्जे शेतकºयांना चार टक्के अशा सवलतीच्या व्याज दराने दिली जातात. यापैकी दोन टक्के व्याजाचा हिस्सा केंद्र सरकार बँकांना देते, तर कर्जाची वेळेवर परतफेड केली तर शेतकºयांना व्याजात तीन टक्क्यांची सवलत मिळते. या निर्णयामुळे शेतकºयांना परतफेडीसाठी आणखी मुदत मिळेलच, शिवाय वाढीव मुदतीत परतफेड करूनही त्यांना व बँकांना व्याजदरातील फायदे पूर्वीप्रमाणेच मिळतील.


‘लॉकडाऊन’मुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे बँकेत जाणे शक्य न झाल्याने, तसेच तयार शेतमालाची विक्री करून त्याचे पैसे मिळण्यात अडचणी आल्याने अनेक शेतकºयांना ही कर्जे वेळेवर फेडणे शक्य झाले नाही, हे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला.

Web Title: Short-term agricultural loans extended till the end of August

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती