धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांसह संपवली जीवनयात्रा; विष घेऊन संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 08:38 PM2021-10-23T20:38:33+5:302021-10-23T20:40:27+5:30

गोपाळ यांची पत्नी जया यांचा ३ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते.

Shocking News Ex-serviceman ends life journey with four children; The whole family committed suicide by taking poison | धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांसह संपवली जीवनयात्रा; विष घेऊन संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

धक्कादायक! माजी सैनिकाने चार मुलांसह संपवली जीवनयात्रा; विष घेऊन संपूर्ण कुटुंबाची आत्महत्या

Next

बेळगाव - संकेश्वर येथील बोरगल (ता. हुक्केरी) येथे तीन मुली आणि मुलासह माजी सैनिकाने विष घेऊन शनिवारी आत्महत्या केली. पत्नीच्या वियोगातून आलेल्या नैराश्यातून त्यांने हे कृत्य केल्याची ग्रामस्थांत चर्चा आहे. शुक्रवारी (ता. २२) रात्रीची ही घटना आज शनिवारी (ता. २३) सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बेळगाव जिल्ह्यासह सीमा भागात हळहळ व्यक्त होत आहे.

माजी सैनिक गोपाळ दुंडाप्पा हादीमनी (वय ४६), मुलगी सौम्या गोपाळ हादीमनी (वय १९), स्वाती गोपाळ हादीमनी (वय १६) व साक्षी गोपाळ हादीमनी (वय १२) आणि मुलगा सृजन गोपाळ हादीमनी (वय १०, रा.बोरगल, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) अशी मृतांची नावे आहेत.
 
गोपाळ यांची पत्नी जया यांचा ३ महिन्यांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला. कुटूंबाचा कणा मोडल्याने, तेव्हापासून ते मानसिक तणावाखाली होते. त्यातूनच संपूर्ण कुटुंबाने विषप्राशन केल्याचा पोलिसांचा कयास आहे. संकेश्वर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
 

Web Title: Shocking News Ex-serviceman ends life journey with four children; The whole family committed suicide by taking poison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app