धक्कादायक! टायटॅनिक बनविणारी कंपनीही बुडाली; एकेकाळी 35 हजारावर होते कर्मचारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 07:04 PM2019-08-06T19:04:49+5:302019-08-06T19:06:07+5:30

टायटॅनिक या महाकाय जहाजाची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. या जहाजामुळे ही कंपनी चर्चेत आली होती. कधीही न बुडणारे जहाज अशी या जहाजाची ओळख करण्यात आली होती.

Shocking! company that made the Titanic ship closed; At one time there were 35,000 employees | धक्कादायक! टायटॅनिक बनविणारी कंपनीही बुडाली; एकेकाळी 35 हजारावर होते कर्मचारी

धक्कादायक! टायटॅनिक बनविणारी कंपनीही बुडाली; एकेकाळी 35 हजारावर होते कर्मचारी

googlenewsNext

बेलफास्ट : जगाला टायटॅनिक नावाचे महाकाय जहाज देणाऱ्या आयर्लंडमध्ये खळबळ माजली आहे. हार्लेंड अँड वोल्फ शिपयार्ड ही तब्बल 158 वर्षे जुनी कंपनी आज बंद झाली आहे. या कंपनीमध्ये 100 वर्षांपूर्वी 35 हजार कर्मचारी काम करत होते. धक्कादायक म्हणजे ही कंपनी बंद झाली त्या दिवशी केवळ 123 कर्मचारी राहिले होते. सोमवारी ही कंपनी बंद करण्यात आली.


टायटॅनिक या महाकाय जहाजाची कथा साऱ्यांनाच माहिती आहे. या जहाजामुळे ही कंपनी चर्चेत आली होती. कधीही न बुडणारे जहाज अशी या जहाजाची ओळख करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच फेरीमध्ये हिमनगाला आदळल्याने हे जहाज बुडाले होते आणि हजारो लोकांना जलसमाधी मिळाली होती. हे जहाज 31 मार्चस 1911 मध्ये लाँच करण्यात आले होते. या जहाजाची बांधणी बेलफास्टमध्ये 1909 ते 1911 या काळात झाली होती. 


या कंपनीने दुसऱ्या विश्वयुद्धावेळी जवळपास 150 पेक्षा जास्त युद्धनौका बनविल्या होत्या. 1945 पासून कंपनी जहाज निर्मितीपासून लांब गेली. बंद होण्याच्या काळात ही कंपनी जलविद्युत आणि समुद्री इंजिनिअरिंगवर काम करत होती. 


हार्लेंड अँड वोल्फ शिपयार्ड कंपनीने एप्रिल 1912 मध्ये तेव्हा चर्चेत आली होती, जेव्हा टायटॅनिक बुडाले होते. या दुर्घटनेत 1517 लोक ठार झाले होते. हे जहाज साऊथम्पटन बंदरावरून न्यूयॉर्कसाठी रवाना झाले होते. टायटॅनिकचे अवशेष 1 सप्टेंबर 1985 मध्ये शोधण्यात आले होते. प्रथम जहाजाची स्थिती गुप्त ठेवण्याची योजना होती कारण जहाज बुडाल्याची जागा कोणाला माहिती होऊ नये असा यामागे उद्देश होता. या जागेला दफनभूमी म्हटले जात होते. 


टायटॅनिक हे जहाज तेव्हाच्या सर्वात अनुभवी लोकांनी बांधले होते. या जहाजाची क्षमता 1178 लोकांची होती. मात्र, प्रत्यक्षात या जहाजावरून 2229 लोक प्रवास करत होते. यामुळे लाईफबोटी कमी पडल्याने मृतांचा आकडा वाढला. 
 

Web Title: Shocking! company that made the Titanic ship closed; At one time there were 35,000 employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.