'शाह-जादा' ला सत्तेचा सहारा! झंडा ऊंचा रहे हमारा! राहुल गांधींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 09:00 PM2017-10-17T21:00:56+5:302017-10-17T21:19:26+5:30

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

Shah-jada 'power of power! Flag is our height! Rahul Gandhi's attack | 'शाह-जादा' ला सत्तेचा सहारा! झंडा ऊंचा रहे हमारा! राहुल गांधींचा हल्लाबोल

'शाह-जादा' ला सत्तेचा सहारा! झंडा ऊंचा रहे हमारा! राहुल गांधींचा हल्लाबोल

googlenewsNext

मुंबई - भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांचा मुलगा जय शाह याच्या कंपनीवरील आर्थिक अनियमिततेवरून कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. मोदी सरकार सत्तेत आल्यापासून जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16,000 टक्के वाढल्याचं वृत्त द वायरने दिलं होतं. त्यावरून राहुल यांनी अमित शाह आणि भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

राहुल गांधी यांनी द वायर या न्यूज वेबसाइटच्या हवाल्याने जय शाह आणि अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे.  ''शाह-जादा को सत्ता का कानूनी सहारा! झंडा ऊंचा रहे हमारा!'' असं ट्विट करताना राहुल यांनी द वायरचं एक वृत्त शेअर केलं आहे. जय शाह याच्यावर राज्य सरकार मेहेरबान असून त्यांना राज्यसरकारद्वारे मदत मिळत आहे असं या वृत्तात म्हटलं आहे. त्याचाच सहारा घेत राहुल यांनी ट्विटरद्वारे भाजपावर टीका केली आहे. 

जय शहा प्रकरण उघड झाल्यानंतर काँग्रेस पक्षानं आणि मुख्यतः राहुल गांधींनी आक्रमक पवित्रा  स्वीकारला आहे. 


काय आहे प्रकरण -
‘द वायर’ या वेबसाईटच्या वृत्तानुसार, 2004 मध्ये अमित शाह यांचा मुलगा जय शाहने टेंपल इन्टरप्रायझेज नावाची कंपनी स्थापन केली होती. या कंपनीत अमित शाह यांच्या पत्नी सोनल शाह व्यवस्थापक बनल्या. 2013 पर्यंत कंपनीने विशेष कमाई केली नाही. पण केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर कंपनीचा टर्नओव्हर 80 कोटी रुपये झाला. एक वर्षात जय शाह यांच्या कंपनीचा टर्नओव्हर 16,000 टक्के वाढला.

 

Web Title: Shah-jada 'power of power! Flag is our height! Rahul Gandhi's attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.