Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाहीच, प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, रेल्वेने दिली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:11 PM2021-12-09T14:11:27+5:302021-12-09T14:13:27+5:30

Indian Railway: कोरोनाकाळामध्ये (Coronavirus) रेल्वे तिकिटावर देण्यात येणाऱ्या सर्व सवलती भारतील रेल्वेने रद्द केल्या होता. आताही रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यामध्ये सवलतीसह अन्य प्रवाशांना सवलत देणार नाही, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

Senior citizens are not relieved, they will have to pay more for travel, the information provided by the railways | Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाहीच, प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, रेल्वेने दिली अशी माहिती

Indian Railway: ज्येष्ठ नागरिकांना दिलासा नाहीच, प्रवासासाठी मोजावे लागणार अधिक पैसे, रेल्वेने दिली अशी माहिती

Next

नवी दिल्ली - कोरोनाकाळामध्ये रेल्वे तिकिटावर देण्यात येणाऱ्या सर्व सवलती भारतील रेल्वेने रद्द केल्या होता. आताही रेल्वे ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यामध्ये सवलतीसह अन्य प्रवाशांना सवलत देणार नाही, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. त्यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान, लोकसभेमध्ये एका प्रश्नाच्या लिखित उत्तर देताना सांगितले की, कोरोनाची साथ आणि प्रोटोकॉलमुळे काही प्रवाशांच्या सर्व वर्गांसाठी सुरू करण्यात येणार नाही.

कोरोनाची साथ आणि कोविडच्या प्रोटोकॉलमुळे प्रवाशांच्या सर्व वर्गांमधील (दिव्यांगांचे ४ वर्ग, रुग्णांच्या आणि विद्यार्थ्यांच ११ वर्ग सोडून) २० मार्च २०२० पासून सर्व सवलती मागे घेण्यात आल्या आहेत. रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, कोरोनाच्या साथीमुळे चार वर्गांमधील दिव्यांग आणि ११ वर्गांमधील आजारी आणि विद्यार्थी यांना वगळून सर्व वर्गांमधील रेल्वेच्या सवलतीच्या तिकिटांची सुविधा मागे घेण्यात आली आहे.

मार्च २०२० पूर्वी सर्व ज्येष्ठ नागरिकांना सर्व वर्गाममध्ये प्रवास करताना रेल्वेकडून सवलत मिळत असे. ही सवलत महिला प्रवाशांसाठी एकुण तिकिटाच्या ५० टक्के आणि पुरुष प्रवाशांसाठी ४० टक्के दिली जात असे. तसेच या सवलतीचा लाभ घेण्यासाठी किमान वयोमर्यादा ही महिलांना ५८ आणि पुरुषांना ६० वर्षे एवढी आहे.

भारतीय रेल्वे ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, खेळाडू, वैद्यकीय कर्मचारी आदींसाठी विविध ५३ वर्गांना सवलत देते. काही सवलती ह्या कोरोना काळात प्रवाशांनी प्रवास टाळावा म्हणून एक पाऊल म्हणून काढून घेण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत विद्यार्थी आणि काही आजारी व्यक्तींना सवलती दिल्या जात आहेत.  

Web Title: Senior citizens are not relieved, they will have to pay more for travel, the information provided by the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.