चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर; तयार केलाय 'मास्टर' प्लान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 05:58 PM2020-08-06T17:58:58+5:302020-08-06T18:00:32+5:30

सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय जवानांना चीनच्या कारवायांवर आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

security agencies 4 to 6 dedicated satellites keeping close eye on chinese military activities | चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर; तयार केलाय 'मास्टर' प्लान

चीनच्या प्रत्येक हालचालींवर भारताची करडी नजर; तयार केलाय 'मास्टर' प्लान

googlenewsNext

नवी दिल्ली : वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलएसी) चिनी सैन्याच्या कुरापती सुरूच आहेत. त्यामुळे चीनच्या प्रत्येक हालचालींवर नजर ठेवण्यासाठी चार ते सहा सॅटेलाइटची आवश्यकता असल्याचे भारतीय सुरक्षा एजन्सींने म्हटले आहे. सॅटेलाइटच्या माध्यमातून भारतीय जवानांना चीनच्या कारवायांवर आणि प्रतिस्पर्ध्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत होईल.

चिनी सैन्याने एलएसीच्यापलिकडे शिनजियांग भागात एका सरावाच्या नावाखाली जबरदस्त शस्त्रास्त्रे आणि तोफखान्यांसह ४०,००० हून अधिक सैनिकांना एकत्रित केले आहे. या सैनिकांना भारताच्या दिशेने पाठवण्यास सुरवात केली. तसेच, बर्‍याच ठिकाणी भारतीय हद्दीत स्थलांतर झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ते १४ कोर मुख्यालयासह लेहमध्ये असलेल्या भारतीय संरचनांना आश्चर्यचकित करत आहे.

सुत्रांच्या दिलेल्या माहितीनुसार, एएनआय या वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, भारतीय भूभाग आणि एलएसीवरील खोल भागात चीनी सैन्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यासाठी हे सॅटलाइट आवश्यक आहेत. सुत्रांचे म्हणणे आहे की, या सॅटलाइटमध्ये उच्च रिझोल्यूशन सेन्सर आणि कॅमेरे आहेत, जे देखरेखीसाठी मदत करू शकतात. इतकेच नाही तर छोट्या छोट्या गोष्टी आणि व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासही ते सक्षम आहे. यामुळे क्षमता आणि संपत्ती असलेल्या चिनी आणि इतर सहयोगी देशांवर नजर ठेवण्यासाठी परदेशी मित्र देशांवरील निर्भरता कमी करण्यात मदत होईल. भारतीय लष्कराकडे आधीपासून प्रतिकूल घटनांवर बारीक नजर ठेवण्यासाठी काही सॅटलाइट आहेत. मात्र, त्या क्षमतेला आणखी बळकटी देण्याची गरज असल्याचे सूत्रांनी सांगितले.

दरम्यान,  चिनी सैन्याने पँगोंग सो लेकजवळील फिंगर भागात भारतीय हद्दीत स्थलांतर केले आहे, जेथे ते माघार घेण्यास नकार देत आहेत. फिंगर - ६ येथे एक निरीक्षण पोस्ट तयार करू इच्छित आहेत. गोग्रा भागात अजूनही काही सैन्य आहे. भारत आणि चीन यांच्यात १४ जुलै रोजी कोर कमांडर स्तरावरील चर्चेनुसार दुर्गम भाग असलेल्या सर्व संघर्षाच्या भागातून सैन्य माघारी घेण्याची अंमलबजावणी चीन करत नाही. उच्च स्तरावर झालेल्या चर्चेनंतर चिनी सैन्य काही भागातून परत गेले, मात्र अजूनही बऱ्याच भागात चिनी सैनिक आहेत. हे लक्षात घेता भारतानेही पूर्ण तयारी केली आहे. दोन ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत भारताने चिनी सैन्याला स्पष्टपणे सांगितले होते की, सर्व भागातून चिनी सैन्याने माघार घेतली पाहिजे.

आणखी बातम्या...

CoronaVirus News : लस तयार होण्यासाठी नेमका किती लागतो कालावधी?

राम मंदिर भूमिपूजनाचे औचित्य साधून 50 मुस्लीम कुटुंबीयातील 250 सदस्यांनी स्वीकारला हिंदू धर्म!    

Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा नेत्याची हत्या, दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या    

मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल; गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला    

Web Title: security agencies 4 to 6 dedicated satellites keeping close eye on chinese military activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.