Coronavirus Cases: कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा भयंकर; तरुण, मुले, गर्भवतींना वेगाने संक्रमण, तज्ज्ञांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2021 03:20 PM2021-04-07T15:20:31+5:302021-04-07T15:23:34+5:30

Coronavirus second wave: कोरोनाची दुसरी लाट देशात आधीपेक्षा खूप जास्त वेगाने पसरत आहे. हे दररोज प्रसिद्ध केले जाणारे आकडेच सांगत आहेत.

second wave of corona is more terrible than before; infections in young, children, pregnant women, experts warn | Coronavirus Cases: कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा भयंकर; तरुण, मुले, गर्भवतींना वेगाने संक्रमण, तज्ज्ञांचा इशारा

Coronavirus Cases: कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा भयंकर; तरुण, मुले, गर्भवतींना वेगाने संक्रमण, तज्ज्ञांचा इशारा

Next

कोरोना व्हायरसची (Corona Virus) ही दुसरी लाट आधीपेक्षाही जास्त खतरनाक आहे. हे दररोज प्रसिद्ध केले जाणारे आकडेच सांगत आहेत. मात्र, डॉक्टरांनी यामागची कारणेही सांगितली आहेत. दिल्लीच्या लोकनायक हॉस्पिटलचे एमडी डॉ. सुरेश कुमार यांनी सांगितले की, या लाटेमध्ये कोरोनामुळे आजारी पडणाऱ्यांच्या संख्येत तरुण, मुले आणि गर्भवती महिलांची संख्या अधिक आहे. (Corona virus second wave is danger than previous, infection youth, children and pregnant women.)


कोरोनाची दुसरी लाट देशात आधीपेक्षा खूप जास्त वेगाने पसरत आहे. गेल्या आठवड्यात 20 रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती झाले होते. आता ही संख्या 170 झाली आहे. दिल्लीमध्ये आता बेड्सची मागणी वाढू लागली आहे. 


डॉ. सुरेश यांनी सांगितले की, आधी जे लोक कोरोना संक्रमित होत होते ते वयोवृद्ध होते. मात्र, आता तरुण, मुले, गर्भवती महिला देखील नवीन कोरोनाच्या लाटेत सापडू लागले आहेत. कोरोनाच्या या लाटेला थोपविण्यासाठी आम्ही हॉस्पिटलमध्ये उपाययोजना केल्या आहेत. मात्र, हॉस्पिटलमधील ओपीडी बंद करण्याबाबत अद्याप काही ठरलेले नाही.

Coronavirus Symptoms : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वेळीच ओळखा ही नवी ३ लक्षणं; नाहीतर होऊ शकतं गंभीर संक्रमण 

दिल्लीच्या एम्समध्ये शिकाऊ डॉक्टरांना घरी पाठविण्यात आले असून सामान्य रुग्णांसाठी ओपीडी बंद करण्यात आली आहे. मुंबईत सापडणाऱ्या रुग्णांपैकी 80 टक्के रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत. डॉ. के.के. अग्रवाल यांच्यानुसार महिला आणि मुलांमध्ये कोरोनाची लक्षणे कमी दिसतात, मात्र त्यांना सावध राहण्याची गरज आहे. जर कोणत्याही व्यक्तीमध्ये कोरोनाचे लक्षण दिसले तर त्याचा अर्थ कोरोना विषाणू त्याच्यावर हल्ला करत आहे. जर तुम्ही कोणा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आला असाल कर आयसोलेट करणे हा एक पर्याय आहे.


दिल्ली, महाराष्ट्र सर्वाधिक संक्रमित...
दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये अचानक वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत दिल्लीत 5100 नवे रुग्ण सापडले आहेत. हा आकडा नोव्हेंबर 2020 नंतरचा मोठा आकडा आहे. यामुळे दिल्लीत नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर पंजाबमध्येही नाईट कर्फ्यूचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक कोरोनाबाधित सापडू लागले आहेत. काल आलेल्या आकडेवारीत 56 हजार नवे रुग्ण सापडले आहेत. 

Web Title: second wave of corona is more terrible than before; infections in young, children, pregnant women, experts warn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.