मालिका पाहून स्वत:च्याच अपहरणाचा रचला बनाव अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 01:15 PM2020-01-11T13:15:09+5:302020-01-11T13:39:15+5:30

अपहरणाच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात.

school boy plans own kidnapping demands 20 lakhs from parents | मालिका पाहून स्वत:च्याच अपहरणाचा रचला बनाव अन्...

मालिका पाहून स्वत:च्याच अपहरणाचा रचला बनाव अन्...

googlenewsNext

ग्रेटर नोएडा - अपहरणाच्या अनेक घटना या सातत्याने समोर येत असतात. चित्रपटात किंवा मालिकेत अनेकदा खंडणी उकळण्यासाठी अपहरणाचा बनाव रचल्याचे प्रसंग असतात. अशीच काहीशी घटना ही ग्रेटर नोएडामध्ये घडली आहे. मालिका पाहून एका विद्यार्थ्याने मित्रांच्या मदतीने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव रचला आणि वडिलांकडे तब्बल 20 लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नववीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने स्वत:च्याच अपहरणाचा प्लॅन रचला आणि कुटुंबियांकडे 20 लाखांची मागणी केली. मित्रांच्या मदतीने त्याने सर्व गोष्टी केल्या. विद्यार्थी आणि त्याचे 4 मित्र हे परीक्षेत नापास झाले होते. त्यामुळे आई-वडील आणि घरातील इतरही नातेवाईक ओरडतील अशी भीती विद्यार्थ्याला वाटत होती. त्यामुळेच त्याने टीव्हीवरील मालिकेत पाहून स्वत:च्या अपहरणाचं नाटक रचलं. 

विद्यार्थ्याने आपल्या मोबाईलवरून घरी कॉल केला आणि काही लोक त्याला मारत असल्याचं खोटं सांगितलं. तसेच फोनवर रडण्याचं नाटकही केलं. त्यानंतर त्याच्या मित्रांनी तुमच्या मुलांचं आम्ही अपहरण केल्याचं पालकांना सांगितलं. तो जिवंत परत हवा असेल तर 20 लाख रुपये द्या असं देखील म्हटलं. मुलाच्या अपहरणाचा फोन आल्यावर वडिलांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस विद्यार्थ्यांच्या घरी पोहोचले. मात्र त्याच दरम्यान घरात नेमकी काय परिस्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्याने आपल्या एका मित्राला घरी पाठवलं. घरी पोहचल्यावर पोलीस आलेले पाहून विद्यार्थ्याचा मित्र घाबरला. तसेच त्यांनी याप्रकरणी तक्रार करू नका असं देखील म्हटलं. त्याच्या वागण्याचा पोलिसांना संशय आल्याने त्यांनी त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली. अधिक कसून चौकशी केली असता मित्राने असलेला सर्व खरा प्रकार पोलिसांना सांगितला. अपहरण झालं नसून हे एक नाटक असल्याचं त्याने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी विद्यार्थी आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेतलं. 

महत्त्वाच्या बातम्या 

...अन्यथा 'छपाक' चित्रपटगृहात दिसणार नाही, निर्मात्यांना हायकोर्टाचे आदेश

विरोधकांच्या बैठकीआधी नरेंद्र मोदींसोबत एकाच मंचावर दिसणार ममता बॅनर्जी

युक्रेनचे विमान चुकून पाडले, इराणी सैन्याने दिली कबुली

Today's Fuel Price : दरवाढीचा भडका! सर्वसामान्यांच्या खिशावर दरवाढीचा भार; पेट्रोल 80 पार

गाई-म्हशीचे दूध दोन रुपयांनी महागले, उद्यापासून अंमलबजावणी 

 

Web Title: school boy plans own kidnapping demands 20 lakhs from parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.