"भाजपा चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर...", मंत्रिपद न मिळाल्याबद्दल संजय निषाद यांचं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 09:02 PM2021-09-27T21:02:40+5:302021-09-27T21:03:45+5:30

sanjay nishad : संजय निषाद यांनाही मंत्रिपद देण्यात येईल, अशा बातम्या येत होत्या. मात्र त्यांना मंत्री बनवण्यात आले नाही. यावरून संजय निषाद यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

sanjay nishad speaks to aajtak if bjp can make tea seller a pm he too have good chances in party | "भाजपा चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर...", मंत्रिपद न मिळाल्याबद्दल संजय निषाद यांचं विधान

"भाजपा चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर...", मंत्रिपद न मिळाल्याबद्दल संजय निषाद यांचं विधान

Next

लखनऊ : भाजपा एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही एखादी चांगली जागा नक्कीच मिळू शकते, असे विधान निषाद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय निषाद यांनी केले आहे. दरम्यान, रविवारी उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळात सात नव्या मंत्र्यांना सामील करुन घेण्यात आले. यादरम्यान, संजय निषाद यांनाही मंत्रिपद देण्यात येईल, अशा बातम्या येत होत्या. मात्र त्यांना मंत्री बनवण्यात आले नाही. यावरून संजय निषाद यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 

सोमवारी संजय निषाद यांनी 'आजतक'शी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, भाजपा एका चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही एखादी चांगली जागा नक्कीच मिळू शकते. आपला लढा हा पद-प्रतिष्ठेसाठी नसून निषादांच्या भल्यासाठी आणि कायद्यांसाठी आहे. संसद हे एक उच्च सदन आहे,  जिथे कायदे बनवले जातात. जर भाजपाने मला तिथे पाठवले तर मी तिथे जाऊन निषादांच्या हिताचे कायदे बनवेन, असे संजय निषाद यांनी म्हटले.

याचबरोबर, मंत्रिपदाविषयी भाष्य करताना ते म्हणाले की, योग्य वेळ येऊ द्या. जर भाजपा चहावाल्याला पंतप्रधान बनवू शकते तर मलाही पुढे नेईल. एका कार्यकर्त्याला मंत्री निश्चित बनवेल. आत्तापर्यंत आम्ही कायदे बनवण्यासाठी संघर्ष करत होतो, पण आता आम्ही स्वतःच कायदे तयार करु, असे संजय निषाद यांनी सांगितले.


दरम्यान,  रविवारी योगी आदित्यनाथ यांच्या अध्यक्षतेखालील भाजपाचा सरकारमध्ये जितिन प्रसाद यांच्यासह सात नव्या मंत्र्यांना उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. छत्रपाल सिंह, पलटु राम, संगीता बलवंत, संजीव कुमार, दिनेश खटीक आणि धर्मवीर सिंह यांचा मंत्रिमंडळात समावेश आहे. संजय निषाद यांनाही मंत्रिपद देण्यात येईल अशा बातम्या येत होत्या, मात्र त्यांना मंत्री बनवण्यात आले नाही.

Web Title: sanjay nishad speaks to aajtak if bjp can make tea seller a pm he too have good chances in party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.