पोलिसांचे वाहन उडवण्याचा प्रयत्न वाळूतस्करांची मुजोरी : सहा जणांविरूध्द गुन्हा
By Admin | Updated: March 8, 2015 00:31 IST2015-03-08T00:31:00+5:302015-03-08T00:31:00+5:30
राहुरी(अहमदनगर) : जिल्ात वाळूतस्करी महसूलसह पोलिसांची डोकेदुखी ठरत असताना वाळूतस्करांची मजल थेट पोलिसांना मारण्यापर्यंत गेली आहे. शेवगावला वाळूतस्तकरीतून एका पोलिसाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी वाळूतस्करांनी चक्क पोलिसांच्या गाडीवर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी तीन वाहनांसह तीस लाखांचा ऐवज जप्त केला आहे. राहुरी पोलिसांत सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांचे वाहन उडवण्याचा प्रयत्न वाळूतस्करांची मुजोरी : सहा जणांविरूध्द गुन्हा
र हुरी(अहमदनगर) : जिल्ह्यात वाळूतस्करी महसूलसह पोलिसांची डोकेदुखी ठरत असताना वाळूतस्करांची मजल थेट पोलिसांना मारण्यापर्यंत गेली आहे. शेवगावला वाळूतस्तकरीतून एका पोलिसाची हत्या झाल्याची घटना ताजी असतानाच शनिवारी वाळूतस्करांनी चक्क पोलिसांच्या गाडीवर डंपर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, पोलिसांनी याप्रकरणी तीन वाहनांसह तीस लाखांचा ऐवज जप्त केला आहे. राहुरी पोलिसांत सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपअधीक्षक प्रांजली सोनवणे यांच्यासह १२ जणांच्या पथकाने शनिवारी पहाटे राहुरी-वांबोरी रस्त्यावर दोनच्या सुमारास वाळू घेऊन जाणार्या एका डंपरला अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी चालक जगन्नाथ बर्डे याने डंपर थेट पोलिसांच्या गाडीवरच घातले. सुदैवाने यात सर्व पोलीस बचावले. वाळूचोरांची मुजोरी एवढ्यावरच थांबली नाही तर त्याने इतर सहकार्यांना बोलावून चक्क पोलीस पथकावर दहशत करण्याचा प्रयत्न केला. परंतु नंतर पोलिसांनी खाक्या दाखवताच तस्करांनी धूम ठोकली. याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या योगेश घोडके यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी धुडघूस घालणार्या किशोर वारूळे, सुधीर दुशिंग, सोनल निकम, युनूस पठाण, प्रमोद कराळे यांच्याविरूध्द राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून बोलेरो,स्वीप्ट व डंपर पोलिसांनी ताब्यात घेतले़ (तालुका प्रतिनिधी)------------दरम्यान, दुसर्या एका कारवाईत पोलिसांनी मुळा नदीपात्रात आरडगाव येथे छापा टाकून दोन डंपर, एक ट्रक व एक टेम्पो वाळूसह सोळा लाख रूपयांचा ऐवज जप्त केला़ यासंदर्भात राहुरी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़