राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 05:44 PM2018-08-24T17:44:03+5:302018-08-24T20:17:51+5:30

डोकलाम वाद हा मोदींसाठी इव्हेंट बनला आहे. त्याकडे प्रक्रिया म्हणून पाहिले असते तर डोकलाम वाद टाळता आला असता

RSS ideology is similar to Muslim organizations in Arab countries; Rahul Gandhi's allegation in London | राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली

राहुल गांधी यांनी केली RSS ची 'मुस्लिम ब्रदरहुड'शी तुलना; भाजप भडकली

Next

लंडन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशाची रचनाच बदलण्याच्या प्रयत्नात आहे. देशातील इतर कोणत्याही संघटनेला देशाच्या स्वायत्त संस्थांवर नियंत्रण ठेवायचे नाही, संघ सोडून. संघाची विचारधारा ही अरब राष्ट्रांत असलेल्या कट्टर मुस्लिमवाद्यांच्या संघघटनेसारखीच (मुस्लिम ब्रदरहुड) आहे, असे गंभीर आरोप काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज लंडनमध्ये केले. यावरून भाजपने संताप व्यक्त केला असून राहुल गांधी अपरिपक्व असून त्यांनी या विधानावर माफी मागण्याची मागणी केली आहे.

काश्मिरमधील दहशतवादावरून काल राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केलेली असताना आज त्यांनी लंडनमध्येही मोदींना लक्ष्य केले. इंटरनॅशनल इंस्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीज (IISS) च्या एका कार्यक्रमात राहुल यांनी डोकलाम वाद हा मोदींसाठी इव्हेंट बनला आहे. तेथे अद्यापही चीनी सैनिक आहेत. इव्हेंट ऐवजी प्रक्रिया म्हणून पाहिले असते तर डोकलाम वाद टाळता आला असता, असे सांगितले. 


मागील चार वर्षांत सरकारमध्ये सत्तेचे केंद्रीकरण करण्यात आले आहे, परंतू विकेंद्रीकरणानंतरच यश मिळते हे ते विसरले. 130 कोटी लोकांमध्ये भेदभावाची भावना निर्माण केली जात आहे. पीएमओ परराष्ट्र मंत्रालयामध्येही हस्तक्षेप करते. परराष्ट्र मंत्र्यांकडेच काही काम नसते, त्यामुळे त्या केवळ व्हिसा देण्याच्या कामातच व्यस्त राहतात, अशी खिल्लीही राहुल यांनी उडविली. 

 



 

नोटबंदीवरूनही राहुल यांनी संघाला लक्ष्य केले. नोटबंदीचा विचार अर्थमंत्री किंवा आरबीआयकडे न येता तो आरएसएसद्वारे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनात भरवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानबाबतही पंत्रधानांकडे कोणतीही ठरविलेली विस्तृत रणनिती नाही. आणि पाकिस्तानकडेही अशी सर्वोच्च संस्था नाही की त्यांच्याशी चर्चा होऊ शकेल. तोपर्यंत आपल्याला वाट पहावी लागेल.

संघावर टीका करणाऱ्या राहुल गांधींवर भाजपने आगपाखड केली आहे. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी संघाची दहशतवादी संघटना मुस्लिम ब्रदरहुडशी तुलना केल्यावरून राहुल गांधी यांना अपरिपक्व म्हटले आहे. तसेच यातून राहुल यांच्या मनामध्ये केवळ संघ, भाजप आणि मोदी यांच्याबद्दल घृणा भरलेली दिसून येत असल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी माफी मागावी, अशी मागणी केली.

'मुस्लिम ब्रदरहुड' ही संघटना अरब देशांमधील सुन्नी समुदायांचे धार्मिक आणि राजकीय संघटन आहे. या संघटनेची स्थापना 1928 मध्ये एक शिक्षक हसन अल बन्ना यांनी केली होती. या संघटनेवर दहशतवादामुळे अरब देशांनी बंदी आणली आहे.

 

Web Title: RSS ideology is similar to Muslim organizations in Arab countries; Rahul Gandhi's allegation in London

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.