पीएफआय, आरआयएफच्या प्रतिनिधींनी ईडीसमक्ष हजेरीसाठी मागितली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 05:37 AM2020-01-30T05:37:17+5:302020-01-30T05:37:27+5:30

मनीलाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी पीएफआय आणि रिहॅबच्या सात पदाधिकाºयांना ईडीने समन्स जारी केले होते.

Representatives of PFI, RIF, asked for ED to appear before the deadline | पीएफआय, आरआयएफच्या प्रतिनिधींनी ईडीसमक्ष हजेरीसाठी मागितली मुदत

पीएफआय, आरआयएफच्या प्रतिनिधींनी ईडीसमक्ष हजेरीसाठी मागितली मुदत

Next

नवी दिल्ली : पॉप्युलर फ्रंट आॅफ इंडिया (पीएफआय) आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांची भेट घेऊन ईडीसमक्ष पदाधिकाऱ्यांना हजर होण्यासाठी आणखी मुदत मागितली आहे.
केरळस्थित पीएफआय आणि रिहॅब इंडिया फाऊंडेशनच्या (आरआयएफ) कायदा प्रतिनिधींनीसमवेत चार अधिकाºयांनी सकाळी साडेदहा वाजता ईडीच्या अधिकाºयांची भेट घेतली. मनीलाँड्रिंग प्रकरणाच्या चौकशीसाठी मंगळवारी पीएफआय आणि रिहॅबच्या सात पदाधिकाºयांना ईडीने समन्स जारी केले होते. त्यांना बुधवारी हजर होण्यास सांगण्यात आले होते.
पीएफआयचे अनिस अहमद यांनी सांगितले की, अध्यक्ष अबुबकर यांच्यासाठी आणखी मुदत मागण्यात आली आहे. त्यांना कर्करोग असून, आंतड्यांचाही त्रास आहे. ते मागील काही महिन्यांपासून इस्पितळात आहेत. आम्ही ईडीच्या कारवाईबाबत सर्व कायदेशीर पर्यायांवर विचार करणार आहोत. आमचे आर्थिक व्यवहार पारदर्शक असून, आयकर विवरणही सादर केलेले आहे. हा प्रकार सुडाचे राजकारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रिहॅबकडूनही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करण्यात आला; परंतु फोन आणि ई-मेलला त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
ईडीच्या अधिकाºयांनी सांगितले की, अबुबकर यांच्या हजेरीची नवीन तारीख दिली जाऊ शकते. अन्य पदाधिकाºयांना पुढच्या आठवड्यात ईडीसमक्ष हजर व्हायचे आहे.
आरआयएफच्या नऊ बँक खात्यांतून काढण्यात आलेली रक्कम आणि दुबईतील खात्यांत २० लाख रुपये जमा असल्याप्रकरणीही ईडी चौकशी करीत आहे. पीएफआय, आरएफआय आणि इतर बँक खात्यांत वेगवेगळ्या वेळी एकूण १२० कोटी रुपये जमा करण्यात आले असून, हा व्यवहारही ईडीच्या चौकशीच्या घेºयात आहे.

निदर्शनांसाठी पैसा
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात उत्तर प्रदेशसह देशातील अन्य भागांत घडलेल्या हिंसक निदर्शनांसाठी देण्यात आलेल्या आर्थिक मदतीमागे पीएफआय असल्याप्रकरणी ईडी अधिक चौकशी करीत आहे.
समन्स जारी करण्यात आलेल्या या दोन्ही संघटनांच्या पदाधिकाºयांत ई. अबुबक, ओ. एम. अब्दुल सलाम, एम. मोहम्मद अली जीना, अनिस अहमद आणि अब्दुल वाहीद सैत, रमीज मुहम्मद व एच. चंद्रकांदी यांचा समावेश आहे.

Web Title: Representatives of PFI, RIF, asked for ED to appear before the deadline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.