CAA : 'शाहीनबाग म्हणजे देश तोडणारा मंच', रविशंकर प्रसाद यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 09:00 AM2020-01-28T09:00:44+5:302020-01-28T09:28:56+5:30

'राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही सीएएबाबत संभ्रम निर्माण करत आहे.'

Ravi Shankar Prasad hits out at Shaheen Bagh protest | CAA : 'शाहीनबाग म्हणजे देश तोडणारा मंच', रविशंकर प्रसाद यांची टीका

CAA : 'शाहीनबाग म्हणजे देश तोडणारा मंच', रविशंकर प्रसाद यांची टीका

Next
ठळक मुद्देशाहीनबाग हा देशाला तोडणारा मंच आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली.'राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही सीएएबाबत संभ्रम निर्माण करत आहे.''शाहीनबागमध्ये मुलांची मन कलुषित करण्याचा प्रयत्न सुरू'

नवी दिल्ली - शाहीनबाग येथे सुरू असलेले आंदोलन नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात नसून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आहे. या कायद्यावरून जनतेची दिशाभूल केली जात आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रचलेला हा डाव आहे. त्यामुळे शाहीनबाग हा देशाला तोडणारा मंच आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शाहीनबाग आंदोलनावर टीका केली आहे. सोमवारी (27 जानेवारी) एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. 

'राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल हे दोघेही सीएएबाबत संभ्रम निर्माण करत आहे. या कायद्यामुळे कोणाचेही नागरिकत्व धोक्यात येणार नाही हे आम्ही वारंवार सांगितले आहे. या देशात प्रत्येक व्यक्ती ही सन्मानाने जगत होती आणि भविष्यातही प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार कायम राहणार आहे. कायद्यातील ज्या कलमावर आक्षेप आहे. त्यावर चर्चा करण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. मात्र कोणीही चर्चा करण्यासाठी पुढे येत नाही' असं रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे. 

Maharashtra CM: Chhatrapati Sambhaji Raje gets angry over Shivarai

प्रसाद यांनी तुकडे तुकडे गँगच्या मदतीने पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात शाहीनबागमध्ये लहान मुलांच्या मनात विष कालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला आहे. तसेच शाहीनबागमधील लोकांना त्रास होत असताना केजरीवाल शांत कसे बसतात असा सवालही त्यांनी केला आहे. रविशंकर प्रसाद यांच्या टीकेला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी देखील उत्तर दिले आहे. शाहीनबाग आंदोलनावर पत्रकार परिषद घेऊन टीका करण्यापेक्षा आंदोलकांशी चर्चा करायला जावं असं आवाहन केजरीवाल यांनी केलं आहे. पत्रकार परिषदेतून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सुटणार नाही असा टोला देखील लगावला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

China Coronavirus : चीनमध्ये कोरोना व्हायरसचं थैमान; 106 जणांनी गमावला जीव

कोरोनाचे विषाणू १३ देशांमध्ये; राज्यात चार संशयित रुग्ण; देशात तिघे

कोरेगाव भीमा तपासासाठी एनआयएचे पथक पुण्यात; पुणे पोलिसांनी दिली नाहीत कागदपत्रे

पक्षीय भेदांना थारा न देता संसदेत राज्याचे प्रश्न मांडा; सर्वपक्षीय खासदारांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन

एअर इंडियाचा १00 टक्के हिस्सा सरकार विकणार; टाटा, हिंदुजा, स्पाइसजेट, इंडिगोला स्वारस्य

 

Web Title: Ravi Shankar Prasad hits out at Shaheen Bagh protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.