बांगलादेश सीमेजवळ सापडले दुर्मिळ पक्षी, एका जोडीची किंमत तब्बल 15 लाख रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 04:13 PM2020-08-14T16:13:22+5:302020-08-14T16:18:25+5:30

बीएसएफच्या जवानांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या हलदर पारा गावामागील जंगलाजवळ एक विशेष अभियान राबवत ही कारवाई केली. हे गाव पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात आहे. 

rare toucan bird pair found on bangladesh border priced rs 15 lakh | बांगलादेश सीमेजवळ सापडले दुर्मिळ पक्षी, एका जोडीची किंमत तब्बल 15 लाख रुपये

बांगलादेश सीमेजवळ सापडले दुर्मिळ पक्षी, एका जोडीची किंमत तब्बल 15 लाख रुपये

googlenewsNext
ठळक मुद्देबाजारात या जोडीची किंमत तब्बल 15 लाख रुपये एवढीहा दुर्मिळ पक्षी मध्य अमेरिकेतील बेलीज देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.हे पक्षी कोलकात्याच्या अलीपूर येथील झूलॉजिकल गार्डनला सोपवण्यात आले आहेत.

नवी दिल्ली - बांगलादेश सीमेजवळ कारवाई करत बीएसएफच्या जवानांनी अत्यंत दुर्मिळ अशा टूकेन पक्षाची जोडी जप्त केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे बीएसएफच्या जवानांनी ही कारवाई केली. हे जवान कारवाईसाठी घटनास्थळी पोहोचले, तेव्हा तेथे उपस्थित असलेल्या संशयितांनी पिंजरा फेकून देत तेथून पळ काढला. या पिंजऱ्यात दुर्मिळ अशा टूकेन पक्षाची जोडी होती. बाजारात या जोडीची किंमत तब्बल 15 लाख रुपये एवढी आहे. हा दुर्मिळ पक्षी मध्य अमेरिकेतील बेलीज देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे.

बीएसएफच्या जवानांनी 13 ऑगस्ट 2020 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे आंतरराष्ट्रीय सीमेलगत असलेल्या हलदर पारा गावामागील जंगलाजवळ एक विशेष अभियान राबवत ही कारवाई केली. हे गाव पश्चिम बंगालच्या उत्तर 24 परगना जिल्ह्यात आहे. 

कारवाईदरम्यान जवानांनी सकाळी सात वाजता जंगलात बांबूंच्या झाडामागे लपून बसलेल्या संशयितांना पाहिले. यानंतर जवानांनी त्यांच्या जवळ पोहोचण्याचा प्रयत्न केला. मात्र, या संशयितांनी भारतातील गावांकडे पळ काढला. पळतांना त्यांच्याकडे एक पिंजराही होता. जवानही त्यांचा पीछा करत होते. मात्र याच वेळी जवळ असलेला पिंजरा संशयितांनी फेकून दिला आणि जंगलाचा फायदा घेत ते पळून जाण्यात यशस्वी ठरले.

यानंतर जवानांनी जंगलाच्या जवळपासच्या भागात तपास केला. यात त्यांना एक पिंजरा सापडला. त्यात, दुर्मिळ टूकेन पक्षांची एक जोडी होती. जप्त करण्यात आलेले हे पक्षी कील-बिल्ड टूकेन जातीचे आहेत. या पक्षांना सल्फर-ब्रेस्टेड टूकेन अथवा रेनबो-बिल्ड टूकेन म्हणूनही ओळखले जाते. हा पक्षी टुकेन जातीतील एक रंगीन लॅटिन अमेरिकन पक्षी आहे.

हे पक्षी दक्षिणी मॅक्सिकोपासून कोलंबियापर्यंतच्या उष्णकटिबंधीत जंगलात आढळून येतात. अंतरराष्ट्रीय बाजारात  या पक्षांची किंमत जवळपास 15 लाख रुपये एवढी आहे. हे पक्षी कोलकात्याच्या अलीपूर येथील झूलॉजिकल गार्डनला सोपवण्यात आले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

Web Title: rare toucan bird pair found on bangladesh border priced rs 15 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.