Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 05:06 PM2020-08-05T17:06:53+5:302020-08-05T17:11:33+5:30

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला.

Ram Mandir Bhumipujan :"This is the defeat of democracy and secularism and the victory of Hindutva," Owesi said. | Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप

Ram Mandir Bhumipujan :"हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेचा पराभव आणि हिंदुत्वाचा विजय’’ ओवेसींनी व्यक्त केला संताप

Next
ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवसअयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनासाठी काँग्रेसही तितकीच जबाबदार

हैदराबाद - अयोध्येमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसींनी म्हटले आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाला विरोध करणाऱ्या असदुद्दीन ओवेसींनी भूमिपूजन सोहळा पार पडल्यानंतर आपला संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे.



दरम्यान, ओवेसी यांनी अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनावरून काँग्रेसवरही घणाघाती टीका केली. अयोध्येतील बाबरी मशिदीच्या पतनासाठी काँग्रेसही तितकीच जबाबदार आहे. देशातील सेक्युलर पक्षांचं पितळ पूर्णपणे उघडं पडलं आहे, अशा शब्दात ओवेसी यांनी आपला संताप व्यक्त केला.



आज आपण खूप भावूक झालो आहोत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितले. मात्र मीसुद्धा तितकाच भावूक झालो आहे. सौहार्द आणि नागरिकत्वामधील समानतेवर माझा विश्वास आहे. मात्र आज ४५० वर्षांपासून तिथे उभ्या असलेल्या मशिदीसाठी मी भावूक झालो आहे, असे ओवेसी म्हणाले.

Web Title: Ram Mandir Bhumipujan :"This is the defeat of democracy and secularism and the victory of Hindutva," Owesi said.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.