टोल वाचवायच्या नादात ड्रायव्हरनं रेल्वे ट्रॅकवर चढवली बोलेरो, तेवढ्यात मालगाडी आली; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 01:57 PM2021-07-21T13:57:39+5:302021-07-21T14:01:05+5:30

प्रत्यक्षदर्शिंनी सांगितल्यानुसार, टोल वाचविण्याच्या नादात बोलेरो चालकाने मुख्य रस्ता सोडून रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा अपघात घडला.

Rajasthan bolero railway accident in falaudi | टोल वाचवायच्या नादात ड्रायव्हरनं रेल्वे ट्रॅकवर चढवली बोलेरो, तेवढ्यात मालगाडी आली; अन्...

टोल वाचवायच्या नादात ड्रायव्हरनं रेल्वे ट्रॅकवर चढवली बोलेरो, तेवढ्यात मालगाडी आली; अन्...

googlenewsNext

राजस्थानातील फलौदी येथे एका ड्रायव्हरला हलगर्जीपणा अत्यंत महागात पडला. ड्रायव्हरने टोल वाचविण्यासाठी आपली बोलेरो थेट रेल्वे ट्रॅकवरच चढवली आणि ती अडकली. याच दरम्यान, मालगाडी आली आणि बोलेरोला जबरदस्त धडकली. या घटनेचा व्हिडिओदेखील सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. 

मालगाडीने बोलेरो उडवली -
ही घटना फलोदीतील खिरवा टोल नाक्याजवळ घडली. ड्रायव्हरने टोल वाचविण्याच्या नादात बोलेरो रोड सोडून कच्च्या रस्त्याने रेल्वे ट्रॅकवर नेली. पण ती रेल्वे ट्रॅकवरच अडकली. तेव्हाच एक मालगाडी आली. ती वेगात होती आणि तिने पाहता पाहता बोलेरोला धडक दिली. ही धडक एवढी भीषण हेती, की बोलेरोचा पार चुराडा झाला. मात्र, या अपघातात ट्रेनला अथवा बोलेरोतील कुठल्याही व्यक्तीचे नुकसान झाले नाही. कारण रेल्वे येण्यापूर्वीच बोलेरोतील लोक उतरले होते.

प्रत्यक्षदर्शिंनी सांगितल्यानुसार, टोल वाचविण्याच्या नादात बोलेरो चालकाने मुख्य रस्ता सोडून रेल्वे ट्रॅक पार करण्याचा प्रयत्न केला. यानंतर हा अपघात घडला. प्रत्यक्षदर्शिंनीच मालगाडी आणि बोलेरोचा हा व्हिडिओ तयार केला आहे. 

दूर जाऊन पडली बोलेरो -
प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले, की गाडी ट्रॅकवर अडकल्यानंतर त्यात बसलेल्या लोकांनी तिला काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न सुरू असतानाच त्यांना फलौदीकडून मालगाड़ी येताना दिसली आणि ते दूर पळाले. अपघातानंतर ही बोलेरो जवळपास वीस फूट दूर जाऊन पडली होती आणि मालगाडी जवळपास दोन तास घटनास्थळीच उभी होती.
 

Web Title: Rajasthan bolero railway accident in falaudi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.