तब्बल 6 लाख रुपयांची आहे ही चप्पल, परीक्षेत कॉपी करण्याचा सर्वात तगडा अन् लेटेस्ट जुगाड

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 08:17 AM2021-09-27T08:17:40+5:302021-09-27T08:21:44+5:30

ही टोळी डिव्हाइस असलेल्या चपलेच्या (Device fitted slippers) माध्यमाने परीक्षेत कॉपी करण्यासाठी सक्रीय होती.

Rajasthan Bluetooth chappals how some tried to cheat in top rajasthan exam know more details | तब्बल 6 लाख रुपयांची आहे ही चप्पल, परीक्षेत कॉपी करण्याचा सर्वात तगडा अन् लेटेस्ट जुगाड

तब्बल 6 लाख रुपयांची आहे ही चप्पल, परीक्षेत कॉपी करण्याचा सर्वात तगडा अन् लेटेस्ट जुगाड

Next

काही मंडळींनी कॉपी करण्याची एक नवी आणि अनोखी पद्धत शोधून काढली आहे. ही पद्धत अत्यंत आधुनिक आहे. याचे फोटो आणि व्हिडोदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरे तर, REET परीक्षेत कॉपी करण्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. हे प्रकरण असे आहे, की तुम्हीही हैराण व्हाल.

राजस्थानशिक्षक पात्रता परीक्षेत (Rajasthan Eligibility Examination for Teacher) बीकानेरमध्ये पोलिसांनी कॉपी करणाऱ्या टोळीच्या प्रमुखसह पाच जणांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून एक चप्पल ताब्यात घेण्यात आली आहे. यात ब्लूटूथ लावण्यात आले होते. सोशल मीडियावर यासंदर्भात फोटो आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही टोळी डिव्हाइस असलेल्या चपलेच्या (Device fitted slippers) माध्यमाने परीक्षेत कॉपी करण्यासाठी सक्रीय होती.

6 लाख रुपयांची एक चप्पल -
या चपलेची किंमत तब्बल 6 लाख रुपये सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 25 लोकांनी अशी चप्पल विकत घेतली आहे. या चपलेसह पोलिसांनी बरेच मोबाईल आणि सीमही जप्त केले आहेत. पुढील तपास सुरू आहे. हा संपूर्ण प्रकार एखाद्या चित्रपटाच्या कथानकासारखाच वाटतो. पण हे प्रत्यक्षात घडले आहे. कॉपी करण्याची पद्धत आता चांगलीच हायटेक झाल्याचे यावरून समोर आले आहे.
 

Web Title: Rajasthan Bluetooth chappals how some tried to cheat in top rajasthan exam know more details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.