रेल्वे भरती; पश्चिम रेल्वेमध्ये या पदांवर काम करण्याची संधी, अशी आहे पात्रता आणि वयोमर्यादा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2020 01:53 PM2020-07-26T13:53:50+5:302020-07-26T14:10:41+5:30

पश्चिम रेल्वेने ज्युनियर टेक्निकल असोसिएट्समधली विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

Railway recruitment; Opportunity to work in these positions in Western Railway, such as eligibility and age limit | रेल्वे भरती; पश्चिम रेल्वेमध्ये या पदांवर काम करण्याची संधी, अशी आहे पात्रता आणि वयोमर्यादा

रेल्वे भरती; पश्चिम रेल्वेमध्ये या पदांवर काम करण्याची संधी, अशी आहे पात्रता आणि वयोमर्यादा

googlenewsNext

मुंबई - भारतीय रेल्वेमध्ये काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी उत्तम संधी चालून आलेली आहे. पश्चिम रेल्वेने ज्युनियर टेक्निकल असोसिएट्समधली विविध पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. या पदांसाठी अर्ज करण्यासाठी किमान वयोमर्यादा १८ वर्षे असून, कमाल वयोमर्यादा पदांनुसार ३३ ते ३८ वर्षे आहे. या भरतीप्रक्रियेबाबतची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे.

 पश्चिम रेल्वेने ज्युनियर टेक्निकल असोसिएटच्या एकूण ४१ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या पदांची विभागणी पुढील प्रमाणे आहे. ज्युनियर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) १९ पदे, ज्युनियर टेक्निकल असोसिएट (इलेक्ट्रिकल) १२ पदे, ज्युनियर टेक्निकल असोसिएट (टेलिकम्युनिकेशन/एस अँड टी) १० पदे. रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या नोटिफिकेशननुसार पात्र उमेदवार २२ ऑगस्टपर्यंत भरतीसाठी अर्ज करू शकतील.

पश्चिम रेल्वेमधील या पदांसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदरांसाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. अर्ज करणारा उमेदवार मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातून पदवीधर असला पाहिजे. संबंधित उमेदवाराकडे संबंधित इंजिनियरिंग विभागातील तीन वर्षांचा डिप्लोमा, किंवा बीएससी किंवा चार वर्षांची बॅचरल पदवी (बीई/बीटेक) असली पाहिजे.

या पदासाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी किमान वयोमर्यादा ही १८ वर्षे निर्धारित करण्यात आलेली आहे. तर कमाल वयोमर्यादा ही ३३ ते ३८ वर्षे एवढी आहे.  

या भरतीप्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराला पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल. तिथे भरतीसंबंधीची लिंक दिलेली आहे. त्यावर क्लिक करावे. तसेच नोंदणीसंबंधीची माहिती त्यात भरावी. तिथे नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल. दरम्यान, उमेदवारांना परीक्षा शुल्क भरावे लागेल. दरम्यान, उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी तो व्यवस्थित तपासून घ्यावा.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू

नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

Web Title: Railway recruitment; Opportunity to work in these positions in Western Railway, such as eligibility and age limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.