Railway Passenger train and short distance trains fares increased | पॅसेन्जर रेल्वे गाड्यांचे भाडे वाढले, भारतीय रेल्वेनं दिलं असं स्पष्टिकरण

पॅसेन्जर रेल्वे गाड्यांचे भाडे वाढले, भारतीय रेल्वेनं दिलं असं स्पष्टिकरण

नवी दिल्ली - भारतीय रेल्वेने पॅसेन्जर (Passenger train) आणि कमी अंतराच्या रेल्वे गाड्यांचे (short distance trains) भडे वाढविले आहे. साधारणपणे 30 दिवसांपासून वाढलेल्या रेल्वेच्या या भाडेवाढीवर रेल्वेने पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिले आहे. यासंदर्भात बोलताना रेल्वेने म्हटले आहे, की या कोवीड संकटाच्या काळात ज्यांच्यासाठी रेल्वे प्रवास फारसा आवश्यक नाही, अशा प्रवाशांना रोखण्यासाठी ही भाडेवाढ करण्यात आली आहे. पॅसेन्जर रेल्वेगाड्यांच्या भाड्यात वाढ करून ते मेल आणि एक्सप्रेस गाड्यांच्या अनारक्षित डब्यांच्या भाड्यां एवढे करण्यात आले आहे. (Railway Passenger train and short distance trains fares increased)

भाडेवाढीवर रेल्वेचे दुसरे स्पष्टिकरण - 
रेल्वेने कोरोना संकटापूर्वीच्या तुलनेत 65 टक्के मेल एक्सप्रेस गाड्या चालवायला सुरुवात केली आहे. एवढेच नाही, तर 90 टक्के सबअर्बन ट्रेनदेखील चालविण्यात आल्या आहेत. यादरम्यान रोजच्या रोज जवळपास 326 प्रवासी रेल्वे सुरू होत्या. तर 1250 मेल/एक्सप्रेस गाड्या आणि 5350 सबअर्बन गाड्या सुरू होत्या. रेल्वेचे म्हणणे आहे, की सध्या सुरू असलेल्या कमी अंतराच्या पॅसेन्जर ट्रेन एकूण पॅसेन्जर ट्रेन्सच्या केवळ 3%च आहेत. यामुळे याचा परिणाम फार कमी प्रवाशांवर होत आहे.

सावधान ! राज्यात दिवसभरात तब्बल 8,807 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ

रेल्वेचे तिसते स्पष्टिकरण - 
भाडेवाढ केल्यानंतर रेल्वेने असेही स्पष्टीकरण दिले आहे, की प्रवासी सेवेवर नेहमीच सब्सिडी दिली जाते आणि प्रत्येक रेल्वे प्रवाशाच्या प्रवासावर रेल्वेला घाटा सहन करावा लागतो. रेल्वे अशाही काही गाड्या चालवत आहे, ज्यात कमी प्रवासी असतात.

वाढलेले भाडे नंतर कमी होणार का?
रेल्वेसेवा पूर्ववत झाल्यानंतर, हे वाढलेले भाडे रल्वे कमी करणार का? यावर रेल्वेचे राष्ट्रीय प्रवक्ता डीजे नारायण म्हणाले, अशा परिस्थितीत वेळो-वेळी रिव्ह्यू केला जातो आणि तेव्हाच्या परिस्थितीवर निर्णय घेतला जातो. महत्वाचे म्हणजे सध्या देशात केवळ स्पेशल ट्रेनच सुरू आहेत.

बापरे! एकाच सोसायटीत आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, चिंचवडमध्ये खळबळ; कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Railway Passenger train and short distance trains fares increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.