कोरोनापेक्षाही मोठं संकट येणार, राहुल गांधींचं 'त्सुनामी' भाकीत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 05:28 PM2020-03-17T17:28:10+5:302020-03-17T17:36:27+5:30

तसेच, लोकसभेत अधिकारीक भाषेसंदर्भात प्रश्न विचारण्यास परवानगी नाकारल्याबद्दलही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, हा तमिळनाडूच्या जनतेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं.

Rahul Gandhi's 'Tsunami' predicts a bigger crisis than Corona in lok sabha | कोरोनापेक्षाही मोठं संकट येणार, राहुल गांधींचं 'त्सुनामी' भाकीत

कोरोनापेक्षाही मोठं संकट येणार, राहुल गांधींचं 'त्सुनामी' भाकीत

Next

नवी दिल्ली - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एक धक्कादायक विधान केले आहे. देशाला केवळ कोरोनापासूनच धोका नसून एक मोठं संकट भारतासमोर असल्याचं त्यांनी म्हटलंय. तोंडासमोर असलेलं आर्थिक संकट हेही प्रचंड मोठं असून त्यासाठी आपल्याला तयार असणे गरजेचं आहे. कारण, आर्थिक संकटामुळे भारतीयांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असे राहुल गांधींनी म्हटले आहे. 

अंदमान निकोबारमध्ये त्सुनामी येण्यापूर्वी पाणी खाली गेले होते. अगदी तसंच आता सर्वकाही खाली गेलंय. लवकरच एक मोठा त्सुनामी येणार आहे, असे राहुल यांनी म्हटले. संसद भवनाबाहेर माध्यमांशी संवाद साधताना राहुल गांधीं म्हणाले की, पुढे काय होईल, याबाबत सरकारला काहीच माहित नाही. मी पहिल्यापासूनच म्हणतोय, देशात आर्थिक त्सुनामी येणार आहे. मी सातत्याने याकडे लक्ष वेधत आहे, जाणीव करून देत आहे. मात्र, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले जाते. सरकारकडून मूर्ख बनविण्यात येत आहे. पुढे आर्थिक स्थिती अतिशय खराब होणार आहे, असेही राहुल यांनी म्हटले.

तसेच, लोकसभेत अधिकारीक भाषेसंदर्भात प्रश्न विचारण्यास परवानगी नाकारल्याबद्दलही राहुल यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच, हा तमिळनाडूच्या जनतेचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान, देशात कोरोना व्हायरसचं मोठ संकट उभारलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी देशपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर राहुल यांनी मोदी सरकारला लक्ष्य करताना, देशातील आर्थिस संकट हे कोरोनापेक्षाही मोठं असल्याचं म्हटलंय. 
 

 

Web Title: Rahul Gandhi's 'Tsunami' predicts a bigger crisis than Corona in lok sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.