स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 01:26 PM2020-07-30T13:26:25+5:302020-07-30T13:35:00+5:30

भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार !

Rafael with stealth ability will be a 'game changer'; The strength of the Indian Air Force will increase! | स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार !

स्टेल्थ क्षमता असलेले राफेल ठरणार 'गेमचेंजर'; भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार !

Next
ठळक मुद्देजगातील पाचव्या पिढीतील लढाऊ विमानेचीनच्या जे 20 विमानापेक्षा सक्षम असल्याचा दावा

निनाद देशमुख

पुणे : बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चेत असलेले राफेल विमान बुधवारी भारतात दाखल झाले. वायू दलाच्या अंबाला विमानतळावर ही विमाने दाखल झाली. या विमानाचे जंगी स्वागत भारतीयांनी केले. मल्टी रोल प्रकारारील हे पाचव्या पिढीचे लढाऊ विमान आहे. गेल्या तीन दशकानंतर भारतीय वायू दलात नवी विमाने दाखल होणार आहेत. सध्या भारतीय हवाईदलात सुखोई एमकेआय 30 ही आधुनिक विमाने आहेत. राफेल विमनामुळे भारतीय सशस्त्र दलाची 'स्ट्रॅटेजिक डेफथ' (सामरिक खोली) वाढणार असून वायू दलाची पोकळी भरून निघणार आहे. 

  भारतीय वायू वायू दलाचा क्षमतेच्या बाबतीत जगात चवथा क्रमांक लागतो. वायू दलाल रशियन बनावटीची मिग21, मिग 29, सुखोई 30 तर फ्रेंच बनावटीची ज्याग्ववॉर, मिराज 2000 ही विमाने आहेत. मात्र, ही विमाने जुनी होत आहेत. तसेच अपघातामुळे आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत जुनी झाल्याने मोठ्या प्रमाणात वायुदलातील स्क्वाड्रनची संख्या कमी झाली आहे.  सध्या वायुदलात ३१ स्क्वाड्रन कार्यरत आहेत. मात्र, देशाच्या सुरक्षेची गरज पाहता आणि पाकिस्तान आणि चीनशी लढायचे झाल्यास वायुदल 42 स्क्वाड्रन असणे अपेक्षित आहेत. एका स्क्वाड्रनमध्ये 16 ते 24 विमाने असतात. यामुळे ही पोकळी भरून निघणे अपेक्षित होते. तसेच तसेच तंत्रज्ञानाच्या बाबतीत आधुनिक विमानांची गरज भारताला होते. भारताच्या शत्रूंचा विचार केल्यास  चीन आणि अमेरीकेच्या सहकार्यातून पाकिस्तानकडे पण अमेरीकेची एफ 16, एफ 17, तर चीनची जेएफ 17 ही विमाने आहेत. चीनचा विचार केल्यास चीन भारतीय वायू दलाच्या तुलनेत संख्या आणि तंत्रज्ञानाच्या बाबतीत पुढे आहे. चीनकडे चेंगडू जे-7, शेनयांग जे-8, शेनयांग जे-11, जे17, चेंगडू जे 20, सुखोई 30 एमकेके, सुखोई 27, सुखोई 35 एस ही विमाने आहेत. चीनने स्वतः लढाऊ विमानाची निर्मिती केली आहे. गेल्या 72 वर्षात भारताने तेजस हे एकमेव हलके लढाऊ विमान बनवले आहे. यामुळे भारतीय वायू दलाला तातडीने नव्या विमानांचे गरज होती. फ्रान्स भारताला 2022 पर्यंत 36 राफेल विमान देणार आहे वायुदलाच्या स्क्वाड्रनची उणीव लवकर भरून निघणार नसली तरी काही प्रमाणात नक्कीच वायू दलाची क्षमता वाढणार आहे. 

राफेल विमानाची वैशिष्ट्य: 

राफेलची मारक क्षमता ३७०० किलोमीटर इतकी आहे. हे विमान २२३० किलोमीटर प्रतितास वेगाने उडण्याची क्षमता आहे. स्नेकमा एम 88-2 टर्बोफॅन इंजिन विमानाला ताशी 2हजार 230  वेग प्रदान करतात. 

*राफेल विमानाचे एव्हीयोनिक्स त्याला उडण्याची उच्च क्षमता प्राप्त करून देतात. काही वेळातच ते जवळपास 65 हजार फुटांपर्यंत म्हणजे 20 हजार फुटांपर्यंत पोहचू शकते. विमानाची इंधन क्षमता जवळपास 17 हजार लिटर आहे.  

* राफेल लढाऊ विमानांमध्ये जगातील सर्वात आधुनिक हवेतून हवेत मारा करणारी मीटिआर क्षेपणास्त्र  आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 150 किमी पर्यंत आहे. लक्ष्याचा अचूक वेध हे हत्यार घेऊ शकते. म्हणजे भारतीय हवाई हद्द न ओलांडता शत्रूच्या सीमेत ते हल्ला करू शकते.

* राफेलमध्ये स्काल्प नावाचे दुसरे सर्वात घातक क्षेपणास्त्र आहे. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता 600 किलो मीटर एवढी आहे. हे विमान एका वेळेला 14 लक्ष्यांवर मारा करू शकते. तसेच सहा हजार किलोग्राम शस्त्रास्त्र वाहून नेण्या नेण्याची क्षमता विमानात आहे.

* राफेल विमानात तिसरे महत्त्वाचे क्षेपणास्त्र म्हणजे हॅमर. 

हॅमर क्षेपणास्त्राची मारक क्षमता 60 ते 70 किमी आहे. ते हवेतून जमिनीवर आणि हवेतून हवेत हल्ला करू शकते. डोंगराळ प्रदेशातील शत्रूंचे बंकर हे क्षेपणास्त्र नष्ट करू शकते भारत आणि चीन यांच्यातील सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने ही क्षेपणास्त्र घेण्याचा निर्णय घेतला आहे फ़्रेंच वायू दल आणि नौदलासाठी हे विकसीत करण्यात आले आहे. भारताने हे क्षेपणास्त्र विकत घेण्याचा कारारही फ्रान्स बरोबर केला आहे. 

*राफेल असं लढाऊ विमान आहे, जे प्रत्येक मोहीमेवर पाठवलं जाऊ शकतं. भारतीय वायूसेना अनेक वर्षांपासून राफेलच्या प्रतीक्षेत होती. राफेल विमान कुठल्याही हवामानात एकाच वेळी अनेक कामं करण्यास सक्षम आहे. त्यामुळे ते मल्टिरोल फायटर एअरक्राफ्ट म्हणूनही ओळखलं जातं.

* अँटी शिप हल्ल्यापासून अणुबॉम्ब हल्ल्यापर्यंत, क्लोज एअर सपोर्ट आणि लेजर डायरेक्ट लॉन्ग रेंज क्षेपणास्त्र हल्यासाठी विमान सक्षम आहे. 

* भारताला मिळणाऱ्या राफेल विमानात इस्रायली हेल्मेट माऊंटेड डिस्प्ले, रडार वॉर्निंग रिसिव्हर्स, लो बॅण्ड जॅमर्स, 

10 तासांची फ्लाईट डेटा रेकॉर्डिंग तंत्रज्ञान, इन्फ्रा-रेड सर्च, 

ट्रॅकिंग सिस्टम हे बदल करण्यात येणार आहे. 

--------------

चीनच्या जे 20 विमानापेक्षा सक्षम असल्याचा दावा

चीनने रिव्हर्स इंजिनिअरिंग करत रशियाच्या विमानाच्या तंत्रज्ञावर आधारित स्वदेशी विमाने बनवली आहे. सध्या जगातील सर्व हवाई दले ही पाचव्या पिढीतील विमाने वापरत आहेत. चीनकडे चेंगडू जे-20 ही पाचव्या पिढीतील विमाने आहेत. पाचव्या पिढीतील विमाने ही इलेक्ट्रॉनिक युद्धप्रणाली आणि शत्रूच्या रडार यंत्रानेपासून वाचू शकते. यामुले या विमानाला स्टेल्थ क्षमता प्राप्त होते. जे 20 विमाने चेंगडू एरोस्पेस कॉर्पोरेशन ने बनवलेले आहे. या विमानातील तंत्रज्ञान आणि रडार यंत्रणेमुळे हे जगातील उत्तम विमान असल्याचा दावा चीनने केला होता. मात्र प्रत्यक्ष युद्धभूमीत ते अद्याप वापरले गेले नसल्याने या विमानाच्या क्षमतेबाबत जागतिक स्तरावर शंका उपस्तीत केल्या जातात. राफेल आणि जे 20 विमानाचा विचार केल्यास राफेल विमानातील  युद्ध प्रणालीने युद्ध भूमीत स्वताला सिद्ध केले आहे. त्यामुळे भारताला चिनी वायुदलाला तोंड देणारा नवा योद्धा मिळलेला आहे, हे नक्की. 

----------^^^^^--------

या युद्धात राफेल ने केले स्वतःला सिद्ध

चीनचे जे 20 हे पाचव्या पिढीतील विमान असले तरी ते कुठल्याच युद्धात वापरले गेले नाही त्या तुलनेत राफेल विमान हे अफगाणिस्तान – तालिबान युद्धाच्या वेळी हे सर्वप्रथम वापरण्यात आले.  २०११ मध्ये लिबियावर टेहळणी करण्यासाठी आणि हवाई हल्ला करण्यासाठी हे विमान वापरले गेले. या युद्धात राफेलची क्षमता जगाला कळाली.  २०१३ मध्ये देखील दशतवाद्यांच्या विरोधात मालीच्या सरकारला मदत म्हणून फ्रांसने हस्तक्षेप केला त्या वेळेस देखील युद्धात राफेल  वापरले गेले. 

 २०१४ मध्ये सप्टेंबर महिन्यात इस्लामिक सेट्स च्या  विरोधात जेव्हा फ्रांसने राफेल वापरले. तसेच इराक वरील हमल्याच्या वेळेस अमेरिकेच्या लष्करात देखील राफेलचा  समावेश करण्यात आला होता. 

...................

राफेलची आणखी काही वैशिष्ट्ये

राफेल हे दोन इंजिन असलेले विमान आहे. यात दोन वैमानिक बसू शकतात.   विमानाची लांबी १५.२७ मी. ( ५०.१ फुट. ),  उंची : ५.३४ मी. ( १७.५ फुट ) आणि पंखांची लांबी : १०.८० मी. ( ३५.४ फुट. ) एवढी आहे. राफेलच्या पंखांच क्षेत्रफळ : ४५.७ स्क़्वे.मी. ( ४९२ स्क्वे.फुट ) आहे. विमान हवेत उडणार , त्याला जास्तीत जास्त गती मिळावी याचा विचार करताना आपल्याला विमानाच्या वजनाचा विचार करावाच लागतो. राफेलचे निव्वळ वजन आहे १०३०० किग्रॅ . ( २२७०० पाउंड्स )  आणि सामानासहित वजन आहे  १५०००किग्रॅ ( ३३००० पाउंड्स ) आणि या विमानाची इंधन क्षमता  ४७०० किग्रॅ ( १०३६० पाउंड्स ) एवढी आहे.

 

जगातील पाचव्या पिढीतील लढाऊ विमाने

तंत्रज्ञानाच्या बाबतीत अमेरिकेचे वायुदल जगात पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतर रशियन वायुदलाचा क्रमांक लागतो अमेरिकेकडे एफ सिरीज मधील चवथ्या आणि पाचव्या पिढीतील विमाने आहेत. अमेरिकेचे एफ 21, एफ 35 ही पाचव्या पिढीतील विमाने आहेत. जगातील सर्वाधिक सक्षम विमान हे एफ 22 विमाने आहेत. अफगाणिस्तान आणि इराक युद्धात या विमानांनी त्याच्या क्षमता सिद्ध केल्या आहेत. नौदलाच्या दृष्टीनेही या विमानांत अनेक बदल करण्यात आले आहे.

रशिया कडील सुखोई आणि मिग विमाने ही चौथ्या आणि पाचव्या पिढीतील विमाने आहेत. सुखोई 35, सुखोई 37 ही पाचव्या पिढीतील विमाने आहेत. भारत सुखोई एमकेआय 30 ही रशियन बनावटीची आधुनिक विमाने वावरत आहे. आता फ्रान्स निर्मित राफेल पाचव्या पिढीतील विमाने भारतीय वायू दलात दाखल झाली आहे

------------

सहाव्या पिढीतील विमानाचे प्रोजेक्ट

अमेरिका, रशिया, जपान, चीन, फ्रान्स, भारत हे राष्ट्र सध्या सहाव्या पिढीतील विमानांच्या प्रकल्पावर काम करत आहेत. भारत आणि रशिया हे सुखोई 57 या प्रकल्पावर एकत्रित काम करत होते. सुखोई 57 हे सर्वाधिक आधुनिक विमान समजले जाते. सध्या या प्रकल्पावर काम सुरू आहे. यातील खर्च जास्त असल्याने भारत या प्रकल्पातून बाहेर पडला. चीन जे 21 या प्रकल्पावर काम करत आहे. तर अमेरिका एफ 22 या विमामांवर काम करून सहाव्या पिढीतील विमाने बनवत आहेत. 

------------

भारतीय वायू दलासाठी गौरवाचा क्षण 

भारतीय वायू दलाला जवळपास 20 वर्षांनी नवी विमाने मिळाली आहे. आम्ही जेव्हा वायू दलात होतो तेव्हा सर्वी मदार ही मिग 21, मिग 23, मिग 27 या विमानांवर होती. ती हळू हळू निवृत्त होत असल्यामुळे नव्या विमानांची गरज भारतीय वायू दलाला होती. मात्र, नव्या विमानाची खरेदी प्रक्रिया राखडल्यामुळे भारतीय वायू दलालतील स्क्वाडर्न झपाट्याने कमी झाल्या. वायू दलात आज 31 स्क्वाडर्न आहेत. मात्र, देशाच्या संरक्षण सिद्धतेसाठी जवळपास 42स्क्वाडर्न ची गरज आहे. राफेल विमाने आल्यामुळे हळू हळू ही पोकळी भरून येणार आहे. भारतीय बनावटीची तेजस विमाणेही वायू दलात दाखल होणार आहे. यामुळे आजच्या दिवस भारतीय वादलासाठी गौरवाचा आणि मानाचा आहे. 

-निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले

 

..........

Web Title: Rafael with stealth ability will be a 'game changer'; The strength of the Indian Air Force will increase!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.