पंजाबमधील मोस्ट वॉण्टेड गँगस्टरला कंठस्नान, तुरुंगातून पळून गेला होता विकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 05:34 PM2018-01-27T17:34:06+5:302018-01-27T17:36:07+5:30

7 नोव्हेंबर 2016 रोजी पतियाळामधील नभा तुरुंगातून पळून जाणाऱ्या सहा कैद्यांपैकी एक असणाऱ्या विकी गौंडरला ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. तुरुंगातून 6 कैदी पळाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते.

Punjab's most-wanted gangster Vicky Gounder killed | पंजाबमधील मोस्ट वॉण्टेड गँगस्टरला कंठस्नान, तुरुंगातून पळून गेला होता विकी

पंजाबमधील मोस्ट वॉण्टेड गँगस्टरला कंठस्नान, तुरुंगातून पळून गेला होता विकी

googlenewsNext
ठळक मुद्देडिसेंबर 2015 रोजी विकीला अटक होऊन नभा तुरुंगात डांबण्यात आले. प्रेमा लाहोरिया आणि काही साथीदारांसह तो नोव्हेंबर 2016मध्ये तो तुरुंगातून पळून गेला.

चंदीगढ- 27 नोव्हेंबर 2016 रोजी पतियाळामधील नभा तुरुंगातून पळून जाणाऱ्या सहा कैद्यांपैकी एक असणाऱ्या विकी गौंडरला ठार मारण्यात पोलिसांना यश आले आहे. तुरुंगातून 6 कैदी पळाल्यापासून पोलीस त्यांच्या मागावर होते. तुरुंगातून पळून जाणाऱ्या या 6 लोकांमध्ये विकी आणि आणि त्या घटनेचा मास्टरमाइंड प्रेमा लाहोरिया यांना पोलिसांनी आज कंठस्नान घातले. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाब पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे.

विकीचे मूळ नाव हरजिंदर सिंग भुल्लर असे होते. तुरुंगातून पळून गेल्यानंतर पंजाब पोलिसांसाठी त्य़ाला पकडणे डोकेदुखी झाली होती. त्याला पकडण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला होता मात्र तो निसटून जाण्यात यशस्वी झाला होता असे पंजाब पोलिसांचे डीजीपी (गुप्तचर) दिनकर गुप्ता यांनी चंदिगढमध्ये बोलताना सांगितले. ''तो लपण्याची शक्यता असलेल्या जागांवरही पोलिसांनी छापे घातले होते मात्र तरिही तो पळून जाण्यात यशस्वी झाला होता. तसेच एप्रिल 2017 मध्ये त्याने गुरुदासपूरमध्ये एका विरुद्ध गटाच्या तीन सदस्यांची हत्याही केली होती. त्यामुळेच पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्याला 10 लाखांचे बक्षीस जाहीर केले होते'', अशी माहिती गुप्ता यांनी दिली. विकी हा मूळचा मुक्तसरमधील बोडला या गावातील रहिवासी होता. जयपाल सिंग नावाच्या कुख्यात गुंडाच्या गँगमध्येही तो होता. त्याच्या विरुद्ध गटातील सुखा काहलवानची हत्या 2015 च्या जानेवारी महिन्यात केल्यानंतर विकी प्रकाशात आला होता.



थाळीफेक खेळात निपूण असणारा विकी गौंडर कोण होता ?
29 वर्षे वयाचा विकी गौंडर गँगस्टर होता. आज त्याच्याबरोबर त्याचे आणखी दोन साथीदार पंजाब-राजस्थान सीमेवर मारले गेले आहेत. थाळीफेक या खेळात राज्य पातळीवर खेळणारा खेळाडू म्हणून तो प्रसिद्ध होता. हरजिंदर सिंगला प्राथमिक शाळेत असल्यापासून विकी अशा टोपणनावाने ओळखले जाई. तसेच तो अधिकाधिक काळ मैदानावर म्हणजे ग्राऊंडवर व्यतीत करत असल्यामुळे त्याला त्याला गौंडर म्हणणे सुरु झाले. आठवीत असेपर्यंत तो थाळीफेकेचा सराव मैदानावर करत असे. 2004 साली त्याने या खेळात आंतरराष्ट्रीय पातळीवर नाव कमवावे यासाठी जालंदरच्या सरकारी क्रीडा महाविद्यालयात पाठवले. तेथे महाविद्यालय पातळीवर त्याने काही पदकेही मिळवली. 2007-08 य़ा वर्षी त्याला बीएसएफने हवालदारपदाची नोकरीही देऊ केली होती, मात्र त्याने ती स्वीकारली नव्हती.



त्याच्याच महाविद्यालयात सराव करण्यासाठी येणाऱ्या आणि लहान मोठे गुन्हे करणाऱ्या नवप्रित सिंग उर्फ लवली बाबाशी त्याची ओळख झाली. लवली बाबाने त्याची ओळख प्रेमा लाहोरियाशी करुन दिली. हे तिघेही एकमेकांचे मित्र झाले. लाहोरिया हा सुखा काहलवान या शार्पशूटरचा खास मित्र होता. 2008 साली त्याने कुटुंबाशी असणारे सर्व संबंध संपवून टाकले. 2010 साली त्यांच्यामध्येच झालेल्या भांडणांमध्ये काहलवानने लवली बाबाला ठार मारले होते. त्यामुळे चिडलेल्या गौंडरने काहलवानला मारण्याची शपथ घेतली होती.

त्याचवर्षी त्याने स्वतःची गँग तयार करण्यासाठी प्रयत्न सुरु केले.  तसेच तो फिरोजपूरचा गँगस्टर जयपालबरोबरही काम करू लागल. 17 सप्टेंबर 2010 रोजी त्याने नवजोत सिंह सर्जू या व्यक्तीची हत्या करुन त्याची कार पळवून नेली. त्यानंतर पुढची सात वर्षे त्याने हत्या, अपहरण, दरोडे असे अनेक गुन्हे पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात केले. 2015 साली त्याने काहलवानची हत्या केली होती. या हत्येचे त्याने संपूर्ण चित्रिकरण केले होते. डिसेंबर 2015 रोजी त्याला अटक होऊन नभा तुरुंगात डांबण्यात आले. प्रेमा लाहोरिया आणि काही साथीदारांसह तो नोव्हेंबर 2016मध्ये तो तुरुंगातून पळून गेला.



 

Web Title: Punjab's most-wanted gangster Vicky Gounder killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा