CM चन्नींबद्दल सिद्धूंचं आक्षेपार्ह वक्तव्य; 2022मध्ये हा काँग्रेस बुडवणार, मला मुख्यमंत्री केलं असतं तर...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 01:47 PM2021-10-08T13:47:21+5:302021-10-08T13:48:56+5:30

माध्यमांतील वृत्तानुसार, मोहाली एयरपोर्ट चौकात येण्यापूर्वी सुद्धू यांनी सीएम चन्नी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाष्य केले आहे. मोहाली एयरपोर्ट चौकातून लखीमपूरकडे जाण्यासाठी एक मार्च निघणार आहे.

Punjab Navjot Singh sidhu abuse punjab cm Charanjit Singh channi | CM चन्नींबद्दल सिद्धूंचं आक्षेपार्ह वक्तव्य; 2022मध्ये हा काँग्रेस बुडवणार, मला मुख्यमंत्री केलं असतं तर...

CM चन्नींबद्दल सिद्धूंचं आक्षेपार्ह वक्तव्य; 2022मध्ये हा काँग्रेस बुडवणार, मला मुख्यमंत्री केलं असतं तर...

Next

पंजाबकाँग्रेसमधील कलह अद्यापही कमी झाल्याचे दिसत नाही. आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू (Navjot Singh sidhu ) पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांच्या संदर्भात अपशब्द वापरताना दिसून आले आहेत. एवढेच नाही, तर सिद्धूंनी स्वत: ला मुख्यमंत्री बनविण्याचीसंदर्भातही भाष्य केले. संबंधित व्हिडिओमध्ये सिद्धूंनी असेही म्हटले आहे, की 2022 मध्ये चन्नी काँग्रेसला बुडवतील. (Navjot Singh sidhu on punjab cm channi)

माध्यमांतील वृत्तानुसार, मोहाली एयरपोर्ट चौकात येण्यापूर्वी सुद्धू यांनी सीएम चन्नी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह भाष्य केले आहे. मोहाली एयरपोर्ट चौकातून लखीमपूरकडे जाण्यासाठी एक मार्च निघणार आहे.

सिद्धूंचं  दुखणं स्पष्टच दिसलं -
संबंधित व्हिडियोमध्ये परगट सिंग (मैरुन पगडी) म्हणतात, की  केवळ 2 मिनिटांतच मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी पोहोचत आहेत. यावर सिद्धू म्हणतात, एवढ्या वेळापासून आम्ही त्यांची वाट पाहत आहोत.

पुन्हा परगट सिंग म्हणतात, की किती लोक जमले आहेत, आज तर बल्ले-बल्ले आहे. यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांच्या अगदी मागे उभे असलेले पंजाब प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष सुखविंदर सिंग डॅनी, म्हणातात की, हा कार्यक्रम सक्सेस आहे. यावर नवजोत सिंग सिद्धू म्हणतात, 'आणखी कुठे सक्सेस. भगवंत सिंग सिद्धूंच्या (नवजोत सिंग सिद्धू यांचे वडील) मुलाला सीएम केलं असंत, तर दिसला असता सक्सेस.' यानंतर सिद्धू यांनी आक्षेपार्ह शब्द वापरले आणि म्हणाले, '2022 मध्ये तर हा काँग्रेसच बुडवेल.'

Web Title: Punjab Navjot Singh sidhu abuse punjab cm Charanjit Singh channi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.