अभिनेत्री जुही चावला हिला ठोठावला २० लाखांचा दंड; हायकोर्टाकडून याचिका निकाली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 07:16 AM2021-06-05T07:16:29+5:302021-06-05T07:18:08+5:30

याचिका करण्याआधी जुही चावलाने हिने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही? ५ जी तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली.

For Publicity Juhi Chawlas 5G Case Dismissed Court Says Pay 20 Lakh | अभिनेत्री जुही चावला हिला ठोठावला २० लाखांचा दंड; हायकोर्टाकडून याचिका निकाली

अभिनेत्री जुही चावला हिला ठोठावला २० लाखांचा दंड; हायकोर्टाकडून याचिका निकाली

Next

नवी दिल्ली : मोबाइलच्या ५ जी तंत्रज्ञानाला विरोध करणारी अभिनेत्री जुही चावला हिने केलेली याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. स्वत:ला प्रसिद्धी मिळावी यासाठी जुहीने ही याचिका केली असल्याचे व त्यामुळे न्याययंत्रणेचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. तसेच जुही चावला हिला २० लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

मोबाइल टॉवरच्या विकिरणांमुळे पर्यावरण तसेच मानवी आरोग्याला धोका आहे असा दावा अभिनेत्री जुही चावला गेल्या काही वर्षांपासून करत आहे. तसेच या तंत्रज्ञानाविरोधात तिने कायम विरोधाची भूमिका घेतली आहे. तिने ५ जी तंत्रज्ञानाविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दाद मागितली होती. 
याचिका फेटाताना न्यायालयाने म्हटले आहे की, ५ जी विरोधातील याचिका जुही चावला हिने केलेली याचिका हा पब्लिसिटी स्टंट आहे. याचिका करण्याआधी जुही चावलाने हिने सरकारकडे हा प्रश्न का मांडला नाही? ५ जी तंत्रज्ञानाविरोधात जुही हिचे म्हणणे सरकारने ऐकले नाही? असे घडले आहे का? सरकारने तुमच्या हक्कावर गदा आणल्याचा प्रकार घडला आहे का? अशा प्रश्नांची सरबत्ती न्यायालयाने केली.

तंत्रज्ञानाला विरोध नाही
जुही चावला हिने नुकतेच म्हटले होते की, आधुनिक तंत्रज्ञानाला माझा विरोध नाही. मात्र ५ जी तंत्रज्ञानाने पर्यावरणाची हानी होणार नाही हे मोबाइल कंपन्यांनी पटवून दिले पाहिजे. मी ५ जीच्या विरोधात नाही, मात्र हे तंत्रज्ञान मानवी आरोग्यास अपायकारक आहे की नाही याबाबत सरकारने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. 
 

Web Title: For Publicity Juhi Chawlas 5G Case Dismissed Court Says Pay 20 Lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app