PUBG बॅन झाला म्हणून काय झाले? हे एकसो एक गेम आहेत ना...खेळा आनंद लुटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 08:05 PM2020-09-02T20:05:41+5:302020-09-02T20:11:52+5:30

PUBG Banned: केंद्र सरकारने आज तिसऱ्यांदा चिनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. याचा जोरदार फटका पब्जी खेळणाऱ्या करोडो भारतीयांना बसला आहे.

PUBG banned, don't worry! these are good options ... play and enjoy | PUBG बॅन झाला म्हणून काय झाले? हे एकसो एक गेम आहेत ना...खेळा आनंद लुटा

PUBG बॅन झाला म्हणून काय झाले? हे एकसो एक गेम आहेत ना...खेळा आनंद लुटा

Next

केंद्र सरकारने आज तिसऱ्यांदा चिनी अॅप्सवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. टिकटॉक, वुई चॅटनंतर आता पब्जी(PUBG) सह 118 अॅप्स बॅन केली आहेत. याचा जोरदार फटका पब्जी खेळणाऱ्या करोडो भारतीयांना बसला आहे. तरुणांमध्ये याचीच चर्चा होत आहे. जणूकाही पब्जीने या तरुणांना मोबाईल गेम्सचे व्यसनच लावले होते. आता PUBG बॅन झाला म्हणून काय झाले, आम्ही तुम्हाला अशाच काही चांगल्या गेम्सची माहिती देणार आहोत. 


गरेना फ्री फायर (Garena Free Fire) हा बॅटल रॉयल गेम ाहे. जो 111 डॉट्स स्टुडीओ आणि सिंगापूरच्या गरेना कंपनीने बनविला आहे. हा गेम 2019 मध्ये जगभरात सर्वाधिक डाऊनलोड केलेला मोबाईल गेम आहे. गुगल प्लेवरही या गेमला "Best Popular Game" चा किताब मिळाला होता. 


दुसरा गेम म्हणजे फ्रंटनाईट (Fortnite). फ्रंटनाईट हा गेम अमेरिकन कंपनीने तयार केलेला आहे. इपिक गेम्सनावाची ही कंपनी आहे. हा गेम 2017 मध्ये लाँच झाला होता.  हा गेम तीन गेम मोडमध्ये उपलब्ध आहे. या तिन्ही गेममध्ये एकसारखाच गेमप्ले आणि गेम इंजिन आहे. Fortnite: Save the World, Fortnite Battle Royale, आणि Fortnite Creative असे हे गेम मोड आहेत. 

 

पब्जीवर बंदी
मोदी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. पबजीसह ११८ मोबाईल ऍप्सवर बंदी घालण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे. याआधी मोदी सरकारनं जवळपास १०० हून अधिक मोबाईल अधिक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर आता आणखी ११८ अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं घेतला आहे. पबजीसह कॅमकार्ड, बायडू, कट कट, वूव, टेन्सेंट वेयून, राईज ऑफ किंग्डम्ज, झॅकझॅक यांच्यासह अनेक अ‍ॅप्सवर सरकारनं बंदी घातली आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका असल्यानं बंदीची कारवाई करत असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं म्हटलं आहे. 'या कारवाईमुळे कोट्यवधी भारतीय मोबाईलधारक आणि इंटरनेट वापरकर्त्यांच्या हितांचं संरक्षण होईल. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेण्यात आला आहे,' असं मंत्रालयानं निवेदनात म्हटलं आहे.
याआधी मोदी सरकारनं टिकटॉकसह अनेक चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. जूनच्या अखेरीस टिकटॉक, हेलोसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीची कारवाई करण्यात आली. यानंतर जुलैमध्ये आणखी ४७ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला. आता सरकारनं पबजीसह लिविक, वीचॅट वर्क, वीचॅट रिडिंग, अ‍ॅपलॉक, कॅरम फ्रेंड्स यासारख्या मोबाईल अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे. 

Web Title: PUBG banned, don't worry! these are good options ... play and enjoy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.