पी.एस. गोलाय सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री, पवनकुमार चामलिंग यांचे २४ वर्षांचे साम्राज्य आले संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2019 04:36 AM2019-05-28T04:36:16+5:302019-05-28T04:36:32+5:30

सिक्किमचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग उर्फ पी.एस. गोलाय यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या सिक्किम क्रांती मोर्चाने (एसकेएम) विधानसभा निवडणुकांमध्ये ३२ पैकी १७ जागा जिंकल्या.

P.S. The 24-year-old empire of Pawan Kumar Chamling, the new Chief Minister of Goal Sikkim, came to an end | पी.एस. गोलाय सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री, पवनकुमार चामलिंग यांचे २४ वर्षांचे साम्राज्य आले संपुष्टात

पी.एस. गोलाय सिक्कीमचे नवे मुख्यमंत्री, पवनकुमार चामलिंग यांचे २४ वर्षांचे साम्राज्य आले संपुष्टात

Next

गंगटोक : सिक्किमचे नवे मुख्यमंत्री म्हणून प्रेमसिंग तमांग उर्फ पी.एस. गोलाय यांनी सोमवारी शपथ घेतली. त्यांच्या सिक्किम क्रांती मोर्चाने (एसकेएम) विधानसभा निवडणुकांमध्ये ३२ पैकी १७ जागा जिंकल्या.
त्यामुळे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांच्या सिक्किम डेमॉक्रेटिक फ्रंटचे २५ वर्षांचे साम्राज्य संपुष्टात आले. चामलिंग यांच्या पक्षाला १५ जागांवर यश मिळविले. गोलाय पूर्वी त्यांच्याच पक्षात होते आणि २00९ साली त्यांना मंत्रीपद नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली. पाच वर्षांपूर्वी त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला.
भ्रष्टाचारप्रकरणी तुरुंगात
गोलाय यांच्याबरोबरच अन्य ११ जणांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. गोलाय हे सिक्किमचे सहावे मुख्यमंत्री आहेत. गोलाय २६ वर्षांचे असताना पहिल्यांदा एसडीएफचे उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून आले होते. विविध खात्यांचे मंत्री म्हणून त्यांनी काम केले. गोलाय यांना भ्रष्टाचाराच्या खटल्यात शिक्षा झाली. गेल्या वर्षी आॅगस्टमध्ये त्यांची सुटका झाली. शिक्षा झाल्याने आपला अर्ज बाद ठरेल या शंकेतून त्यांनी यंदा निवडणूक लढविली नव्हती. (वृत्तसंस्था)

Web Title: P.S. The 24-year-old empire of Pawan Kumar Chamling, the new Chief Minister of Goal Sikkim, came to an end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.