अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2025 07:19 IST2025-10-18T07:18:25+5:302025-10-18T07:19:19+5:30
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘एलसीए एमके-१ए’ च्या तिसऱ्या आणि ‘एचटीटी ४० एअरक्राफ्ट’ च्या दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे देशार्पण झाले.

अभिमानास्पद! लढाऊ ‘स्वदेशी तेजस’ची गगनभेदी भरारी; संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
नाशिक : भारत संरक्षण उत्पादनांमध्ये ६५ टक्के स्वयंपूर्ण असून या क्षेत्रातील उत्पादनांमध्ये देशाला शंभर टक्के आत्मनिर्भर बनवण्याचे ध्येय असल्याचे प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांनी नाशिकमध्ये केले. ओझर येथील एचएएलमध्ये बांधणी झालेल्या स्वदेशी तेजस या लढाऊ विमानाच्या देशार्पण सोहळ्यात ते बोलत होते.
गगनभेदी गर्जनेसह ‘स्वदेशी तेजस’ने हवेत उड्डाण घेताच टाळ्यांच्या आकाशभेदी कडकडाटाने लढाऊ विमानांच्या निर्मितीतील आत्मनिर्भरतेच्या हुंकाराचाच प्रत्यय नाशिक एचएएलच्या भूमीवरून जगाला दिला. एचएएलमधील तेजस आणि एचटीटी ४० या दोन स्वदेशी विमानांनी उड्डाण घेताच हजारो कंठांमधून झालेला जल्लोष हा भारताला संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भरतेसह लढाऊ विमाने निर्यातदारांच्या पंक्तीत नेऊन ठेवण्याचे प्रतीक ठरला. सुखोई- ३० या विमानाच्या हवाई कसरतींची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.
संरक्षण मंत्री राजनाथसिंह यांच्या हस्ते देशार्पण
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते ‘एलसीए एमके-१ए’ च्या तिसऱ्या आणि ‘एचटीटी ४० एअरक्राफ्ट’ च्या दुसऱ्या मॅन्युफॅक्चरिंग लाईनचे देशार्पण झाले.