Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षात मंथन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2021 05:50 AM2021-10-26T05:50:34+5:302021-10-26T05:51:05+5:30

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची घोषणा पक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेआधी करतील म्हणजे इतर राजकीय पक्षांना शेवटच्या क्षणी पेचात पकडता येईल.

Priyanka Gandhi shakes hands with party in contesting Assembly elections pdc | Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षात मंथन

Priyanka Gandhi : प्रियांका गांधी यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत पक्षात मंथन

Next

- शीलेश शर्मा 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी लढवून मुख्यमंत्री पदावर दावा करण्याच्या आधी हे तपासून घेत आहेत की, राज्यात आपल्या लोकप्रियतेचा आलेख किती उंचावला आहे.

समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांच्या तुलनेत आपला पाया किती बळकट आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी पक्षात दोन स्तरांवर विचार सुरू आहे. त्यात राज्यातील काँग्रेस नेत्यांशी चर्चा तथा प्रतिज्ञा यात्रेत संपूर्ण राज्यात पक्षाने केलेली दुसऱ्या अंतर्गत पाहणीचा समावेश आहे.

दोन्हीचे निष्कर्ष हे सांगतील की, प्रियांका गांधी विधानसभा निवडणूक लढवणार की नाही.  पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने म्हटले की, प्रियांका गांधी रायबरेली किंवा अमेठी लोकसभा मतदारसंघातील एका विधानसभा मतदारसंघातून उभे राहण्याची तयारी करीत आहेत. 

ऐनवेळी घोषणा
प्रियांका गांधी निवडणूक लढवण्याची घोषणा पक्ष निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तारखेआधी करतील म्हणजे इतर राजकीय पक्षांना शेवटच्या क्षणी पेचात पकडता येईल.

Web Title: Priyanka Gandhi shakes hands with party in contesting Assembly elections pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.