हेडलाईन मॅनेजमेंटचं काम कधीपर्यंत करणार?; प्रियंका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2019 01:30 PM2019-09-03T13:30:34+5:302019-09-03T13:32:33+5:30

मंदीचे वास्तव सगळ्यांना ठाऊक आहे. सरकार कधीपर्यंत हेडलाईन मॅनेजमेंट करून काम करणार?

Priyanka Gandhi Lashes Out On Modi Government On Economic Slowdown And Advice To Accept Truth | हेडलाईन मॅनेजमेंटचं काम कधीपर्यंत करणार?; प्रियंका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

हेडलाईन मॅनेजमेंटचं काम कधीपर्यंत करणार?; प्रियंका गांधींचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना सवाल

Next

नवी दिल्ली - आर्थिक मंदीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. कोणतंही खोटं शंभर वेळा सांगितले तरी ते सत्य होत नाही. केंद्र सरकारला हे मान्य करावं लागेल की, अर्थव्यवस्थेत ऐतिहासिक मंदी आली आहे, या मंदीतून सावरण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात. मंदीचे वास्तव सगळ्यांना ठाऊक आहे. सरकार कधीपर्यंत हेडलाईन मॅनेजमेंट करून काम करणार? असा सवाल प्रियंका गांधी यांनी सरकारला विचारला आहे. 

यापूर्वीही प्रियंका गांधी यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या वक्तव्य विरोधकांनी राजकारण करू नका या टीकेला प्रियंका गांधी म्हणाल्या होत्या की, देशात मंदी आहे की नाही हे सरकार स्वीकारणार आहे का? अर्थमंत्र्यांनी राजकारणाशिवाय आपल्या अर्थव्यवस्थेचं सत्य देशातील जनतेला सांगायला हवं. जर हेच सत्य अर्थमंत्री स्वीकारायला तयार नसतील तर सर्वात मोठी समस्येचं निरसन करणार? असा सवाल त्यांनी केला होता. 

31 ऑगस्ट रोजी प्रियंका गांधी यांनी सरकारवर टीका करताना अच्छे दिनचा भोंगा वाजविणाऱ्या भाजपाने अर्थव्यवस्थेची हाल बिघडवून टाकले आहेत. जीडीपी दराने आता हे स्पष्ट झालं आहे, देशातील लोकांचे रोजगार गेले आहेत. अर्थव्यवस्था नष्ट करण्यामागे कोण जबाबदार आहे? हा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला होता. 

आधीच मंदीच्या माऱ्याने रुतण्याच्या स्थितीत असलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेच्या चाकांची गती आणखी मंदावली आहे. मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातील मंदी, कृषी क्षेत्रात झालेली घट, यामुळे भारताचा सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा (जीडीपी) वृद्धिदर २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या नीचांकापर्यंत खाली उतरला असून, तो ५ टक्के झाला आहे. यापूर्वी २०१२-१३ मध्ये एप्रिल-जूनच्या तिमाहीत ४.९ टक्के एवढा कमी वृद्धिदर नोंदविला गेला होता. २०१८-१९ मध्ये याच तिमाहीत तो ८ टक्के एवढ्या उच्च स्तरावर गेला होता. यावर्षीच्या जानेवारी-मार्चच्या तिमाहीत तो ५.८ टक्के होता. 

२०१९-२० मध्ये जीडीपीचा वृद्धीदर ७ टक्क्यांऐवजी ६.९ टक्के राहील, असा अंदाज रिझर्व्ह बँकेने मागील जून महिन्यात व्यक्त केला होता, तसेच एकूण मागणी वाढवून विकासाबाबतची चिंता दूर करण्याच्या आवश्यकतेवरही भर दिला होता. रिझर्व्ह बँकेने पहिल्या सहामाहीत जीडीपी वृद्धीदर ५.८ ते ६.६ टक्क्यांच्या दरम्यान व दुसºया सहामाहीत ७.३ ते ७.५ टक्क्यांच्या दरम्यान राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. चीनचा आर्थिक वृद्धीदर २०१९ च्या एप्रिल-जून तिमाहीत ६.२ टक्के होता. मागील २७ वर्षांतील तो सर्वांत कमी राहिला
 

Web Title: Priyanka Gandhi Lashes Out On Modi Government On Economic Slowdown And Advice To Accept Truth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.