महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:05 AM2020-08-15T03:05:09+5:302020-08-15T03:05:16+5:30

शौर्य सन्मान - जम्मू-काश्मीरचा सर्वाधिक गौरव

President's Medal to five police officers from Maharashtra | महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

महाराष्ट्रातील पाच पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

Next

नवी दिल्ली : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्रातील ५८ पोलीसांना विविध श्रेणीतील पुरस्कार व राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, १४ जणांना पोलीस शौर्य पदक तर प्रशंसनीय सेवेसाठी ३९ जणांना ‘पोलीस पदक जाहीर झाले आहे. देशभरातून २१५ पोलीस कर्मचाºयांना शौर्य तर अतुलनीय सेवेसाठी ८० अधिकाºयांना राष्ट्रपती पोलीस पदकाने सन्मानित केले जाईल. गुणवंत सेवेसाठी ६३१ जणांना यंदा निवडण्यात आले आहे. जम्मू-काश्मीरमधून सर्वाधिक १२३ जणांना शौर्य पुरस्कारांची घोषणा केंद्रीय गृह मंत्रालयाने केली.

प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक
विनायक देशमुख (सहा. इनस्पेक्टर जनरल, मुंबई), शिरीष देशपांडे (उपायुक्त, पुणे),
तुषार दोशी (पोलीस अधिक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र, मुंबई), नरेंद्रकुमार गायकवाड (उप-अधिक्षक, रेल्वे, पुणे), मोहम्मद इलियास मोहम्मद सईद शेख (असिस्टंट कमांडंट एसआरपीएफ, औरंगाबाद), सुनील यादव (उपायुक्त, पुणे), सादीक अली नुसरत अली सय्यद (असिस्टंट कमांडंट, एसआरपीएफ, पुणे), दिगूभाई शेख (पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, उस्मानाबाद), प्रतिभा जोशी (पोलीस निरिक्षक, कोथरूड, पुणे), संजय धुमाळ (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, अंबरनाथ), सीताराम कोल्हे (पोलीस निरिक्षक, केंद्रीय गुन्हे युनीट, नाशिक), केदारी कृष्णा पवार (पोलीस निरिक्षक, गुन्हे शाखा, मुंबई), सुनील धनावडे (पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सिंधुदुर्ग), अनिल पात्रुडकर (पोलीस निरिक्षक- एसीबी, पुणे), सुयर्Þकांत बनगर (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, मुंबई), हरीश खेडकर (पोलीस निरिक्षक, एसीबी अहमदनगर), अशोक राजपूत (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, पनवेल), अरविंद अल्हाट (पोलीस निरिक्षक (वायरलेस), पुणे), विनय घोरपडे (पोलीस निरिक्षक, मुंबई), शालिनी शर्मा (वरिष्ठ पोलीस निरिक्षक, नागपूर), विलास पेंडुरकर (उपनिरिक्षक, नागपाडा, मुंबई), मच्छिंद्र रानमळे (उपनिरिक्षक, चाळीसगाव), वीरेंद्रकुमार चौबे (उपनिरिक्षक, सायबर, अमरावती), संजय गायकवाड (उपनिरिक्षक, गुन्हे शाखा, पमे), भाऊसाहेब एरंडे (उपनिरिक्षक, औरंगाबाद ग्रामीण), रमेश बरडे (सहा. उपनिरिक्षक, बल्लारशा, चंद्रपूर), संदीप शर्मा (सहा. उपनिरिक्षक, गुन्हे शाखा, नागपूर), जनार्दन मोहरूळे (सहा. उपनिरिक्षक, वाहतूक शाखा, चंद्रपूर), शाम वेतळ (सहा. उपनिरिक्षक, पीसीआर, नाशिक), विश्वास भोसले (सहा उपनिरिक्षक, चेंबूर), विजय खर्चे (सहा- उपनिरिक्षक, अकोला), रऊफ शेख (सहा. उपनिरिक्षक, अहमदनगर), मोईनुद्दीन तांबोळी (सहा. उपनिरिक्षक, जालना), पांडुरंग कवाळे (सहा. उपनिरिक्षक, पीसीआर, नाशिक), कैलास सनांसे (सहा. उपनिरिक्षक, औरंगाबाद), दिलीप चौरे (सहा. उपनिरिक्षक, पोलीस मुख्यालय, औरंगाबाद, ग्रामीण), सुनील पाटील (सहा. उपनिरिक्षक, एसडीपीओ कार्यालय, जळगाव), तात्याराव लोंढे (मुख्य कॉन्स्टेबल, एसआयडी, औरंगाबाद.)

‘पोलीस शौर्य पदक’
राजेश खांडवे, महेश गोर्ले, गोवर्धन वधाई, कैलास उसेंडी, कुमारशा किरंगे, शिवलाल हिडके, सुरेश कोवासे, रतीराम पोरेती , प्रदीपकुमार गेडाम, राकेश नरोटे, राकेश हिचामी, वसंत तडवी, सुभाष उसेंडी, रमेश कोमिरे.

महाराष्ट्र : ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ (पीपीएम)
रितेश मुन्नी कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक व संचालक, पोलीस वायरलेस, महाराष्ट्र राज्य, पुणे.
संजीव कुमार सिंघल, अतिरिक्त पोलीस महासंचालक (प्रशासन), पोलीस महासंचालक, शहीद भगतसिंग रोड,कुलाबा, मुंबई.
सुषमा शैलेंद्र चव्हाण, पोलीस उप-अधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग, पुणे.
विजय पोपटराव लोंढे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे शाखा, नाशिक.
गणेश जगन्नाथ मेहत्रे, सहायक उपनिरीक्षक, लातूर.

Web Title: President's Medal to five police officers from Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.