...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 10:36 AM2020-10-31T10:36:41+5:302020-10-31T10:39:11+5:30

Pulwama Attack BJP And Congress : पाकिस्तानने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

prakash javadekar said congress should apologize for calling bjp terrorist attack in pulwama | ...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

...म्हणून पुलवामाप्रकरणी काँग्रेसने देशाची माफी मागावी, भाजपाची मागणी

Next

नवी दिल्ली - भारतातील पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला हे पाकिस्तानचेच कारस्थान होते, हे आता स्पष्ट झाले आहे. तशी कबुलीच खुद्द पाकिस्तानच्या मंत्र्याने दिली आहे. पाकिस्तानच्या संसदेत मंत्री फवाद चौधरी यांनी या हल्ल्याचे समर्थन करताना इम्रान खान सरकारचे हे मोठे यश असल्याचा दावा केला. पाकिस्तानने पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याची कबुली दिल्यानंतर भाजपाने काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसवर टीका करत त्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणी केली आहे. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जम्मू-श्रीनगर महामार्गावर पुलवामा येथे सुरक्षा दलांच्या गाडीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ४० जवानांना वीरमरण आले. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने स्वीकारली होती. काँग्रेस व इतर पक्षांनी हा हल्ला म्हणजे ‘राजकीय कट-कारस्थान’ असल्याचा आरोप केला होता. मात्र आता पाकिस्तानी मंत्र्यानेच हल्ल्याची कबुली दिली असल्याने काँग्रेसने भाजपावर केलेला आरोप खोटा ठरला आहे. त्यामुळे काँग्रेसने देशाची माफी मागितली पाहिजे असं ट्वीट केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारताला चोख प्रत्युत्तर दिल्याचेही पाकिस्तानने सांगितले. पाकिस्तानी हवाई दलाने भारतात घुसून भारतीय जवानांना मारल्याचा दावाही त्यांनी केला. पाकमधील विरोधी पक्षांनी विचारलेल्या प्रश्नावर मंत्री फवाद चौधरी म्हणाले, आम्ही भारताला त्यांच्या हद्दीत घुसून मारलं आहे आणि पुलवामात जे यश मिळालं ते इम्रान खान सरकारचंच मोठं यश आहे. रात्री उशिरा चौधरी यांनी आपण असे म्हणालोच नसल्याचे सांगत यू टर्न घेतला.

पाकिस्तानचे मंत्री दहशतवादाचे समर्थक असल्याचे झाले उघड 

पाकिस्तानचे केंद्रीय मंत्री फवाद चौधरी यांनी  पुलवामा हल्ला हे पंतप्रधान इम्रान खान सरकारचे मोठे यश होते, असे वक्तव्य करत इम्रान यांच्या अडचणींत भर घातली आहे. पाकिस्तानचे  मंत्री उघडउघड दहशतवादाचे समर्थन करत असल्याचा हा ढळढळीत पुरावा असल्याची टिप्पणी भारताने केली आहे. काश्मीर आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशांमध्ये जमिनी घेण्याच्या केंद्राच्या नियमावर पाकिस्तानने केलेली टीका भारताने फेटाळून लावली आहे. 

Web Title: prakash javadekar said congress should apologize for calling bjp terrorist attack in pulwama

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.