मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर दिल्लीतील पोलिसांचे आंदोलन मागे 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 09:14 PM2019-11-05T21:14:49+5:302019-11-05T21:15:31+5:30

वकिलांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राजधानी दिल्लीतील शेकडो पोलिसांनी दिल्लीतील पोलिस मुख्यालयाबाहेर सुरू केलेले आंदोलन अखेर १० तासांनंतर मागे घेण्यात आले आहे.

Police agitation in Delhi backed after assuring demands | मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर दिल्लीतील पोलिसांचे आंदोलन मागे 

मागण्या मान्य करण्याच्या आश्वासनानंतर दिल्लीतील पोलिसांचे आंदोलन मागे 

Next

नवी दिल्ली - वकिलांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज राजधानी दिल्लीतील शेकडो पोलिसांनी दिल्लीतील पोलिस मुख्यालयाबाहेर सुरू केलेले आंदोलन अखेर १० तासांनंतर मागे घेण्यात आले आहे.  पोलिस कर्मचाऱ्यांनी केलेल्या अनेक मागण्या मान्य करण्यात आल्यानंतर आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सतत समजावल्यानंतर आंदोलनकर्त्या पोलिसांनी हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

 वकिलांनी पोलिसांना केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज शेकडो कर्मचाऱ्यांनी पोलिस मुख्यालयाबाहेर आंदोलन करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर या पोलिसांची समजूत घालण्यासाठी दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. तसेच पोलिसांच्या सर्व योग्य मागण्या मान्य केल्या जातील, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. 



आंदोलनकर्त्या पोलिसांना समजावण्यासाठी स्वत: दिल्लीच्या पोलिस आयुक्तांसह, जॉइंट पोलीस कमिश्नन आणि इतर वरिष्ठ अधिकारी दाखल झाले होते. ते आंदोलनकर्त्या पोलिसांना शिस्त आणि द्लिली पोलिसांच्या प्रतिमेची जाणीव करून देत होते. आंदोलनकर्त्या पोलिसांचे नेतृत्व कुणीच करत नसल्याने पोलिस अधिकाऱ्यांना समजावताना अडचणी येत होत्या. 

Web Title: Police agitation in Delhi backed after assuring demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.