पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये केदारनाथ दौऱ्यावर?  PMO ची टीम उत्तराखंडमध्ये दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 12:40 PM2021-09-23T12:40:03+5:302021-09-23T12:42:41+5:30

narendra modi : विशेष म्हणजे, केदारनाथ धामच्या नवनिर्माणच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट देखील महत्त्वपूर्ण असू शकते.

pm narendra modi visit to kedarnath possible in october pmo team reached | पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये केदारनाथ दौऱ्यावर?  PMO ची टीम उत्तराखंडमध्ये दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्टोबरमध्ये केदारनाथ दौऱ्यावर?  PMO ची टीम उत्तराखंडमध्ये दाखल

Next

डेहराडून : उत्तराखंडमधील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यात भाजपाचे प्रमुख नेते उत्तराखंडला पोहोचतील. यातच ऑक्टोबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उत्तराखंडमधील केदारनाथ दौऱ्यावर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथील कार्याचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची (पीएमओ) एक टीम केदारनाथला पोहोचली आहे. (pm narendra modi visit to kedarnath possible in october pmo team reached)

पंतप्रधान कार्यालयाचे सल्लागार भास्कर खुल्बे, आयएएस मंगेश घिल्डियाल इतर अधिकाऱ्यांसह केदारनाथला पोहोचले आहेत. ही टीम गुरुवारी दुपारी 12 वाजेपर्यंत येथील कामांची व व्यवस्थेची पाहणी करतील. दरम्यान, 6 ऑक्टोबरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथला भेट देऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

दरम्यान, न्यूज 18 ने दिलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीच्या हालचालींचा भाग म्हणून भाजपा ऑक्टोबर महिन्यात पार्टीच्या प्रमुख नेत्यांसाठी उत्तराखंडला भेट देण्याची योजना आखत आहे. सध्या पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्या भेटींचे ठिकाण, दिवस आणि वेळ याबद्दल एक रूपरेषा तयार केली जात आहे. 

या रुपरेषेअंतर्गत, केदारनाथमधील व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाची टीम पोहचली आहे, ज्यामुळे असे मानले जाते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी येथे येणार आहेत. विशेष म्हणजे, केदारनाथ धामच्या नवनिर्माणच्या दृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही भेट देखील महत्त्वपूर्ण असू शकते.


अमित शाह 16-17 ऑक्टोबरला दौऱ्यावर 
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह 1 ऑक्टोबर रोजी उत्तराखंडला भेट देणार आहेत, असे सांगितले जात आहे. तर अमित शाह 16-17 ऑक्टोबर रोजी डेहराडून आणि हरिद्वार दौऱ्याची तयारी करत आहेत. पंतप्रधान, संरक्षण मंत्री, गृहमंत्री यांच्या दौऱ्यातील सर्वात महत्वाचे म्हणजे गृहमंत्री अमित शहा यांचा दौरा मानला जात आहे, ज्यामध्ये हरिद्वारमध्ये संतांना भेटतील आणि निवडणुकीचा मूड देखील जाणून घेतील.
 

Web Title: pm narendra modi visit to kedarnath possible in october pmo team reached

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.