CoronaVirus : 21 दिवस 9 गरीब कुटुंबांची मदत करून देवीची आराधना करा, पंतप्रधानांचे जनतेला आवाहन  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 07:26 PM2020-03-25T19:26:26+5:302020-03-25T19:29:13+5:30

मोदी म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे रुप आहे. माता शैलपुत्रीला प्रकृतीची देवताही म्हटले जाते. आज देश ज्या संकाटातून चालला आहे, आशा वेळी तिच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. मी कामना करतो, की आपण तिच्या आशीर्वादेने या संकटाचा धैर्याने सामना करू.

PM Narendra Modi spoke to people of his constituency varanasi wednesday sna | CoronaVirus : 21 दिवस 9 गरीब कुटुंबांची मदत करून देवीची आराधना करा, पंतप्रधानांचे जनतेला आवाहन  

CoronaVirus : 21 दिवस 9 गरीब कुटुंबांची मदत करून देवीची आराधना करा, पंतप्रधानांचे जनतेला आवाहन  

Next
ठळक मुद्देमोदी म्हणाले, कोरोना व्हायरस आपली संस्कृती आणि संस्कार नष्ट करूच शकत नाही  कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते - मोदी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक हेल्पलाईन नंबरही सार्वजनिक केला

वाराणसी - कोरोनाला केवळ करुणेनेच प्रत्युत्तर दिले जाऊ शकते. आपण या संकटप्रसंगी गरिबांच्या प्रती करुणा दाखवू शकतो. आता नवरात्र सुरू आहे. या निमित्ताने आपण पुढील 21 दिवस 9 गरीब कुटुंबाचे पालन करण्याची जबाबदारी घेतली, तर नवरात्र यशस्वी होईल. या शिवाय आपल्या सभोवताली असणाऱ्या प्राण्यांचीही काळजी घ्या, असे आवाहन पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज जनतेला केले. संपूर्ण जगभरात थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसबरोबरच्या लढाल्या सुरुवात केल्यानंतर, त्यांनी आज वाराणसीतील जनतेशी संवाद साधला. 

मोदी म्हणाले, नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते. माता शैलपुत्री स्नेह, करुणा आणि ममतेचे रुप आहे. माता शैलपुत्रीला प्रकृतीची देवताही म्हटले जाते. आज देश ज्या संकाटातून चालला आहे, आशा वेळी तिच्या आशीर्वादाची अत्यंत आवश्यकता आहे. मी कामना करतो, की आपण तिच्या आशीर्वादेने या संकटाचा धैर्याने सामना करू.


कोरोना व्हायरस आपली संस्कृती आणि संस्कार नष्ट करूच शकत नाही. यामुळे संकटाच्या काळात आपली संवेदना जागृत होते. मी म्हणालो, की सर्वकाही व्यवस्थित आहे, तर ते स्वतःलाच धोका दिल्यासारखे होईल. या क्षणाला केंद्र सरकार असो अथवा राज्य सरकारे या व्हायरसशी लढण्याचा पराकोटीने प्रयत्न करत आहेत. आपल्या देशासमोर एवढेमोठे संकट असताना आणि संपूर्ण जग या संकटाशी लढत असताना, सर्वकाही ठीक होईल असे म्हणणे म्हणजे, आपणच आपल्याला धोका दिल्यासारखे आहे, असे मोदी म्हणाले.

महाभारताचे युद्ध 18 दिवसांत जिंकले गेले होते. मात्र आज कोरोनाविरुद्ध संपूर्ण देश जे युद्ध लढत आहे, ते 21 दिवस चालणार आहे. 21 दिवसांतच हे युद्ध जिंकण्याचा आपला प्रयत्न आहे, असेही मोदी म्हणाले,

वाराणसीतील जनतेच्या प्रश्नांना उत्तरे देताना मोदी म्हणाले, अनेकदा लोक माहिती असतानाही चुका करतात. कोरोनाशी लढण्यासाठी केवळ सोशल डिस्टंसिंग हाच उपाय आहे. यामुळेच लोक बरेही होत आहेत. याची अनेक उदाहरणेही सापडली आहेत.  यावेळी मोदींनी एक हेल्पलाइन नंबरही सार्वजनिक केला. मोदी म्हणाले, कोरोनासंदर्भातील अचूक आणि योग्य माहिती घेण्यासाठी सरकारने व्हॉट्सअॅपच्या सहाय्याने एक हेल्पडेस्कदेखील तयार केला आहे. जर तुमच्याकडे व्हॉट्सअॅप सुविधा असेल तर, 9013151515 या क्रमांकावर 'नमस्ते' लिहून पाठवा. तुम्हाला योग्य माहिती मिळणे प्रारंभ होईल.

आज आपण जो त्रास सहन करत  आहोत, तो सध्या केवळ 21 दिवसांचाच आहे. कोरोनाचे संकट नष्ट झाले नाही आणि त्याचा प्रसार थांबला नाही, तर केवढे मोठे नुकसान होणार आहे, याचा अंदाज लावता येणार नाही. निराशा पसरविण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र,  जीवन हे केवळ आशा आणि विश्वासावरच चालते. आपण एक नागरिक म्हणून प्रशासनाला जेवढे सहकार्य कराल तेवढेच चांगले परिणामही येतील. प्रशासनावर कमीत कमी ताण यावा हाच आपल्या सर्वांचा प्रयत्न असायला हवा. आपण, रुग्णालयांत काम करणारे, पोलीस कर्मचारी, शासकीय कार्यालयांत काम करणारे आणि माध्यमप्रतिनिधी यांचा विश्वास वाढवायला हवा, असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

Web Title: PM Narendra Modi spoke to people of his constituency varanasi wednesday sna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.