PM Narendra Modi Sarkaar: Allocation of portfolios among Ministers from Maharashtra | महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?... जाणून घ्या
महाराष्ट्रातल्या सात मंत्र्यांकडे कोणती खाती?... जाणून घ्या

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात त्यात महाराष्ट्रातील सात शिलेदारांचा समावेश आहे.चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत.'मोदी सरकार १' मध्ये महाराष्ट्राकडे जी खाती होती, तीच 'मोदी 2.0' मध्येही कायम राहिली आहेत. 

देशात 'नमो 2.0' पर्व गुरुवारी संध्याकाळपासून सुरू झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ५८ खासदारांनी गुरुवारी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यात महाराष्ट्रातील सात शिलेदारांचा समावेश आहे. चार कॅबिनेट आणि तीन राज्यमंत्रिपदं महाराष्ट्राच्या वाट्याला आली आहेत. त्यात कुणाला कुठलं खातं मिळतं, कुणाला नवं मंत्रालय मिळतं, याबद्दल उत्सुकता होती. परंतु, 'मोदी सरकार १' मध्ये महाराष्ट्राकडे जी खाती होती, तीच 'मोदी 2.0' मध्येही कायम राहिली आहेत. 

कॅबिनेट मंत्री

>>नितीन गडकरी – रस्ते वाहतूक मंत्री, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री

>>अरविंद सावंत – अवजड उद्योग मंत्री

>> पियुष गोयल – रेल्वे मंत्री, वाणिज्य मंत्री

>> प्रकाश जावडेकर – पर्यावरण मंत्री, माहिती आणि प्रसारण मंत्री

राज्यमंत्री

>>रामदास आठवले – सामाजिक न्याय राज्यमंत्री

>>संजय धोत्रे – मनुष्यबळ विकास राज्यमंत्री, दूरसंचार राज्यमंत्री, माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री

>>रावसाहेब दानवे – अन्न आणि सार्वजनिक वितरण राज्यमंत्री, ग्राहक मंत्रालयाचे राज्यमंत्री


 


Web Title: PM Narendra Modi Sarkaar: Allocation of portfolios among Ministers from Maharashtra
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.