'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 03:30 PM2021-11-19T15:30:28+5:302021-11-19T15:31:16+5:30

गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

pm narendra modi repeal Farm laws election masterstoke social media reaction | 'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स

'खून रंग लाया है, तानाशाही हार गयी...'; मोदी सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यानंतर, अशा येतायत सोशल मीडिया रिअ‍ॅक्शन्स

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले आहेत. दिल्लीच्या विविध सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होण्यापूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पूर आला आहे. काही जण या निर्णयाला निवडणुकीशी जोडून पाहत आहेत, तर काही जण याला मास्टरस्ट्रोक म्हणत आहेत. (PM Narendra Modi repeal Farm laws)

गुरू नानक देव यांच्या प्रकाश पर्वानिमित्त देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, 'आम्ही काही शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या हिताच्या काही गोष्टी समजाऊ शकलो नाही. कदाचित आमची तपश्चर्या कमी पडली असेल. आम्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा महापूर आला आहे. अनेक जण भाजपच्या या निर्णयावर आपले मत व्यक्त करताना दिसत आहेत. एका युझरने ट्विट केले, की "खून रंग लाया है, तानाशाही हार गयी.....ऑंदोलन जीत गया. 

तसेच एका युझरने ट्विट केले आहे, की "भारतातील शेतकऱ्यांसोबत मोदी सरकार कसे वागले, कधीही विसरणार नाही." याच बरोबर, एका ने एक फोटो पोस्ट केला आहे, त्यावर एक शेतकरी व्यक्ती दाखवत आता आम्ही जिंकलो, असे लिहिलेले आहे.

एका युझरने ट्विट केले आहे, "अभिमान कितीही असो तो तुटतो नक्की. हा न्यायाचा विजय आहे. हा जनतेचा विजय आहे. हा निरंकुश व्यवस्थेविरुद्ध एकत्र आलेल्या शेतकऱ्यांचा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे.

मात्र, अनेक लोक या तिनही कृषी कायदे मागे घेण्याचा विरोध करत आहेत. एका ट्विटर युझरने लिहिले आहे की, कृषी कायदे मागे घेणे, हा केवळ एक वाईट निर्णयच नाही ,रत लज्जास्पदही आहे. देशातील छोट्या आणि गरीब शेतकऱ्यांसाठी आज काळा दिवस आहे. 


 

Web Title: pm narendra modi repeal Farm laws election masterstoke social media reaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.