Narendra Modi : "...हे माझे चांगले मित्र, त्यांचा माझ्यावर विश्वास"; मोदींनी केलं काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2021 11:21 AM2021-10-02T11:21:14+5:302021-10-02T12:00:37+5:30

PM Narendra Modi And Ashok Gehlot : मोदींनी काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याचं भरभरून कौतुक केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.

pm narendra modi praised the congress chief minister ashok gehlot | Narendra Modi : "...हे माझे चांगले मित्र, त्यांचा माझ्यावर विश्वास"; मोदींनी केलं काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक

Narendra Modi : "...हे माझे चांगले मित्र, त्यांचा माझ्यावर विश्वास"; मोदींनी केलं काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याचं कौतुक

Next

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi ) यांनी काँग्रेसच्या एका मुख्यमंत्र्याचं भरभरून कौतुक केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. राजस्थानमध्ये चार वैद्यकीय महाविद्यालयांच्या पायाभरणीच्या व्हर्च्युअल समारंभात पंतप्रधान मोदी बोलत होते. यावेळी मोदी यांनी मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांचे आभार मानत खूप कौतुक केलं आहे. "राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे माझे चांगले मित्र आहेत" असं मोदींनी म्हटलं आहे. तसेच कोरोना संकटाविषयी बोलताना भारताने या काळात आपली शक्ती वाढवण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केल्याचं देखील सांगितलं आहे. 

"मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी राज्यासाठीच्या विकासकामांची यादीच माझ्यासमोर ठेवली आहे. यामधून हे स्पष्ट दिसून येतं की, वेगवेगळ्या राजकीय विचारधारा असूनही त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. यासाठी मी अशोक गेहलोत यांचे आभार मानतो. मुख्यमंत्री गेहलोत हे माझ्याशी खुल्या मनाने बोलले. कारण त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. ही मैत्री आणि विश्वासच हा लोकशाहीचा सर्वात मोठा विजय आहे" असं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मोदींच्या या विधानानंतर अशोक गेहलोत देखील स्मितहास्य केल्याचं म्हटलं जात आहे. 

राजस्थानमध्ये चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "कोरोना महामारीने जगभरातील आरोग्य क्षेत्राबद्दल बरंच काही शिकवलं आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक देश आपापल्यापरिने या संकटाला समोरं जात आहे. दरम्यान, भारताने या काळात आपली शक्ती वाढवण्याचा आणि आत्मनिर्भर होण्याचा संकल्प केला आहे. राजस्थानमध्ये चार नवीन वैद्यकीय महाविद्यालयांचं बांधकाम सुरू होणं आणि जयपूरमध्ये पेट्रोकेमिकल्स संस्थेचं उद्घाटन होणं ही याच दिशेने उचललेली महत्त्वाची पावलं आहेत. केंद्र सरकारने 2014 पासून राजस्थानमध्ये 23 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे. त्यापैकी सात महाविद्यालयांचं काम सुरू झालं आहे”, असंही म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 


 

Web Title: pm narendra modi praised the congress chief minister ashok gehlot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.