पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 6 राज्यांना New Year गिफ्ट; गरिबांना मिळणार स्वस्त घरे!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: January 1, 2021 01:39 PM2021-01-01T13:39:53+5:302021-01-01T13:39:53+5:30

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ष 2022पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी ...

PM Narendra Modi lays foundation stone of light house projects | पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 6 राज्यांना New Year गिफ्ट; गरिबांना मिळणार स्वस्त घरे!

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 6 राज्यांना New Year गिफ्ट; गरिबांना मिळणार स्वस्त घरे!

Next

नवी दिल्ली -पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी वर्ष 2022पर्यंत देशातील सर्व बेघर कुटुंबांना पक्की घरे देण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमाने लाईट हाऊस प्रोजेक्टचे उद्घाटन केले. नव्या वर्षातील हा पंतप्रधान मोदींचा पहिलाच कार्यक्रम होता. 

पंतप्रधान मोदींचा हा कार्यक्रम शहरी भारतील लोकांना घरे देण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा ठरेल. या प्रोजेक्टअंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारे एकत्रितपणे, त्रिपुरा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड आणि तामिळनाडूतील गरीब जनतेला स्वस्त, भूकंपविरोधी आणि मजबूत घरे देतील.

यावेळी संबोधित करताना मोदी म्हणाले, आज मध्यम वर्गासाठी घरे तयार करण्यासाठी देशाला एक नवे तंत्र मिळात आहे. हे 6 लाईट हाऊस प्रोजेक्ट देशाला गृह निर्माणाचा मार्ग दाखवतील. ही लाईट हाऊस घरे आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केली जातील. ही घरे अधिक मजबूत आणि गरिबांसाठी सुविधाजनक तसेच आरामदायकही असतील. तसेच, हे एक को-ऑपरेटिव्ह फेडरलिझमचे उदाहरण आहे, असेही मोदी म्हणाले.

रोज तयार होतील अडीच ते तीन घरे -
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, लाईट हाऊस प्रोजेक्टअंतर्गत देशातील 6 शहरांमध्ये 365 दिवसांत 1 हजार घरे बांधली जातील. मोदी म्हणाले, याचा अर्थ रोजच्या रोज अडीच ते तीन घरे बांधून तयार होती. यावेळी मोदींनी, इंजिनिअर्स, विद्यार्थी आणि प्रोफेसर्स यांना आवाहन केले, की त्यांनीही या घरांच्या साईटवर जावे आणि या प्रोजेक्टचे आध्ययन करावे. मोदी म्हणाले, आपण या घरांसाठी विदेशी तंत्रज्ञानाचा वापर करत आहोत. आपण याचे अध्ययन करावे, तसेच हे भारतासाठी योग्य आहे का, की यात काही सुधारणा करण्याची आवश्यकता आहे, हे पाहावे.

असा आहे लाईट हाऊस प्रोजेक्ट -
लाईट हाऊस प्रोजेक्टसाठी ज्या राज्यांची निवड करण्यात आली आहे. त्यांत त्रिपुरा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, झारखंड आणि गुजरातचा समावेश आहे. लाईट हाऊस प्रोजेक्ट ही केंद्रीय नगरविकास मंत्रालयाची महत्वाकांक्षी योजना आहे. याअंतर्गत लोकांना स्थानिक हवामानाचा आणि पर्यावरणाचा विचार करून टिकाऊ घरे दिली जातील. या प्रोजेक्टमध्ये एका विशेष तंत्रज्ञानाचा वापर करून स्वस्त आणि मजबूत घरे तयार केली जातात. यात कंपन्यांतूनच बीम-कॉलम आणि पॅनल तयार करून आणले जातात आणि घरांसाठी वापरले जातात. यामुळे घर बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि पैसा वाचतो. विशेष म्हणजे या प्रोजेक्टअंतर्गत तयार झालेली घरे पूर्णपणे भूकंपविरोधी असतील.
 

Web Title: PM Narendra Modi lays foundation stone of light house projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.