pm narendra modi to launch karadhan to reward taxpayers | पंतप्रधान आज करणार पारदर्शक कराधान मंचाचे उद्घाटन

पंतप्रधान आज करणार पारदर्शक कराधान मंचाचे उद्घाटन

नवी दिल्ली : प्रत्यक्ष कर सुधारणांमधील पुढचे पाऊल असणाऱ्या पारदर्शक कराधान मंचाचे उद्घाटन गुरूवारी (दि. १३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

पंतप्रधानांच्या हस्ते होणाऱ्या उद्घाटनानंतर गेल्या सहा वर्षांपासून प्रत्यक्ष करप्रणालीमध्ये सुरू असलेल्या बदलांना आणखी पुढे नेण्याची प्रक्रिया गतिमान होणार असल्याचे मानले जात आहे. करप्रणाली अधिक सुटसुटीत करणे, प्रत्यक्ष करांचे नियम सुलभ करणे आणि करांचे दर कमी करणे यावर आधारित कर सुधारणा केल्या जात आहेत. करदाते आणि प्रशासन यांच्यामधील नाते अधिक विश्वासाचे बनावे यासाठीही अनेक बदल केले गेले आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: pm narendra modi to launch karadhan to reward taxpayers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.