पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात 'हे' हेलिकॉप्टर; कुठेही लँडिंग करण्याची क्षमता, तरीही...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 05:40 AM2021-12-09T05:40:41+5:302021-12-09T05:41:16+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेकदा देशांतर्गत प्रवासासाठी याच हेलिकॉप्टरचा वापर करतात.

PM Narendra Modi also uses mi-17v-5 helicopter; Ability to land anywhere | पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात 'हे' हेलिकॉप्टर; कुठेही लँडिंग करण्याची क्षमता, तरीही...

पंतप्रधान नरेंद्र मोदीही वापरतात 'हे' हेलिकॉप्टर; कुठेही लँडिंग करण्याची क्षमता, तरीही...

googlenewsNext

 २५० किमी प्रतितास वेगाने उडते

६००० मीटर उंचीपर्यंत उडू शकते.

७५०० किलो हेलिकॉप्टरचे वजन 

३६,००० किलो वजन उचलण्याची क्षमता

कुठेही लँडिंग करण्याची क्षमता

एमआय-१७व्ही-५ हेलिकॉप्टर एमआय-८/१७ या मालिकेतील लष्करी वाहतुकीचे व्हेरिएंट आहे.- जगभरातील ६० देशांमध्ये १२ हजारांहून अधिक एमआय-१७ हेलिकॉप्टर वापरात आहेत.

हायटेक हेलिकॉप्टर, तरीही दोन अपघात

बहुपयोगी हेलिकॉप्टर अशी एमआय-१७व्ही-५ हेलिकॉप्टरची ओळख आहे. शस्त्रास्त्रांची वाहतूक असो वा फायर सपोर्ट, हवाई गस्त असो वा सर्च आणि रेस्क्यू ऑपरेशन किंवा मग लष्करी मोहीम असो, या सगळ्यांत एमआय-१७व्ही-५ महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमाणे कार्गो ट्रान्सपोर्टसाठीही या हेलिकॉप्टरचा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर व्हीव्हीआयपींच्या सेवेतही हे हेलिकॉप्टर असते. पंतप्रधान नरेंद्र मोदीही अनेकदा देशांतर्गत प्रवासासाठी याच हेलिकॉप्टरचा वापर करतात.

हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये
मध्यम ट्विन टर्बाइन हेलिकॉप्टर
हेवी लिफ्ट, ट्रान्सपोर्टेशन, व्हीव्हीआयपी मूव्हमेंट आणि रेस्क्यू मिशनमध्ये उपयुक्त
क्रू मेंबर्ससह ३६ जण या हेलिकॉप्टरमध्ये बसू शकतात.
मात्र, व्हीव्हीआयपींसाठी तयार केलेल्या व्हेरिएंटमध्ये २० जणांना बसता येते.

भारतात कधीपासून वापर?

भारताने डिसेंबर, २००८ मध्ये ८० एमआय हेलिकॉप्टर्सची ऑर्डर रशियाला दिली होती. २०११ मध्ये एमआय हेलिकॉप्टर्सचा पहिला ताफा लष्कराकडे सुपूर्द झाला. २०१३ मध्ये ३६ एमआय सीरिजचे हेलिकॉप्टर मिळाले. २०१२-२०१३ दरम्यान ७१ एमआय-१७ व्ही-५ हेलिकॉप्टर्सची ऑर्डर दिली गेली. जुलै, २०१८ मध्ये पाच हेलिकॉप्टर्स भारतात दाखल झाले.

Web Title: PM Narendra Modi also uses mi-17v-5 helicopter; Ability to land anywhere

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.