PM Modi Speech: जातीय हिंसाचारावरुन पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2022 01:12 PM2022-05-20T13:12:17+5:302022-05-20T13:12:27+5:30

PM Modi Address: राजस्थानच्या जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले.

PM Modi Speech: PM Narendra Modi targets opponents over communal violence in BJP meeting | PM Modi Speech: जातीय हिंसाचारावरुन पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

PM Modi Speech: जातीय हिंसाचारावरुन पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर निशाणा, म्हणाले...

Next

PM Modi Address: राजस्थानमधील जयपूरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक होत आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना संबोधित केले. मोदींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली. भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशासमोरील आव्हानांचा सामना आपल्याला करायचा आहे.

मोदी स्वत: जयपूरला गेले नसले तरी त्यांनी व्हिडिओ कॉन्फर्सिंगद्वारे बैठकीत सहभाग घेतला. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीला भाजपचे सर्व बडे नेते पोहोचले. यावेळी पीएम मोदी म्हणाले की, आज आपण पाहत आहोत की, काही पक्षांची इकोसिस्टम संपूर्ण ताकदीनिशी देशाच्या मुख्य समस्यांवरुन दुसरीकडे वळवण्यात गुंतलेली आहे. अशा पक्षांच्या फंदात आपण कधीही पडू नये. आपण कधीही शॉर्टकट घेऊ नये. देशाच्या हिताशी निगडीत जे काही मूलभूत मुद्दे आहेत, जे मूळ मुद्दे आहेत त्यावर आपल्याला पुढे जायचे आहे.

जगाला भारताकडून खूप अपेक्षा- पंतप्रधान मोदी
यादरम्यान पीएम मोदी म्हणाले की, जेव्हा आपण भाजपचे स्वरुप पाहतो, तेव्हा आपल्याला अभिमान वाटतो. मी पक्षाच्या त्या सर्व लोकांना नमन करतो ज्यांनी स्वत: ला या पक्षाच्या उभारणीत खर्च केले. 21व्या शतकाचा काळ भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. जग आज भारताकडे मोठ्या अपेक्षेने पाहत आहे. त्याचप्रमाणे भारतात भाजपप्रती जनतेची विशेष आपुलकी दिसून येते. देशातील जनतेच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. देशासमोर जी आव्हाने आहेत, त्या प्रत्येक आव्हानावर देशातील जनतेच्या सोबतीने मात करायची आहे.

भाजपने लोकांची विचारसरणी बदलली - पंतप्रधान
आपल्या देशात एकेकाळी चालढकलपणा केला जायचा. ना त्यांना सरकारकडून अपेक्षा होती, ना सरकारने त्यांच्या प्रति उत्तरदायित्वाचा विचार केला होता. पण, 2014 नंतर भाजपने या विचारसरणीतून देशाला बाहेर काढले. देशाच्या उज्ज्वल भवितव्याची मी पूर्ण आतुरतेने वाट पाहत आहे. मी देशातील तरुणांना आत्मविश्वासाने भरलेले पाहतो, बहिणी-मुलींना काहीतरी करण्याची हिंमत दाखवून पुढे जाताना पाहतो, तेव्हा माझा आत्मविश्वासही अनेक पटींनी वाढतो.

'मला पुढील 25 वर्षांचे ध्येय ठरवायचे आहे'
मोदी पुढे म्हणाले की, देशातील लोकांची ही आशा आणि आकांक्षा आपली जबाबदारी खूप वाढवते. स्वातंत्र्याच्या या अमृत कार्यात देश स्वत:साठी पुढील 25 वर्षांची उद्दिष्टे ठरवत आहे. भाजपसाठी हीच वेळ आहे, पुढील 25 वर्षांची उद्दिष्टे निश्चित करण्याची, त्यांच्यासाठी सतत काम करण्याची. पंडित दीनदयाल उपाध्याय यांचे अखंड मानवतावाद आणि अंत्योदय हे आपले तत्त्वज्ञान आहे. आपले विचार हे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचे सांस्कृतिक राष्ट्रीय धोरण आहे. 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास' हा आमचा मंत्र आहे, असे मोदी म्हणाले.

Web Title: PM Modi Speech: PM Narendra Modi targets opponents over communal violence in BJP meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.