CoronaVirus: मला बी योगदान देऊ द्या की; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 03:39 PM2020-05-14T15:39:31+5:302020-05-14T15:56:35+5:30

CoronaVirus: कर्ज बुडवल्याचा आरोप असलेल्या मल्ल्यानं ट्विट करून दर्शवली पैसे देण्याची तयारी

Please take my money unconditionally and close Vijay Mallya to Indian government kkg | CoronaVirus: मला बी योगदान देऊ द्या की; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट

CoronaVirus: मला बी योगदान देऊ द्या की; पंतप्रधान मोदींच्या पॅकेजवर मल्ल्याचं ट्वीट

googlenewsNext

नवी दिल्ली: कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवा (मंगळवारी) आत्मनिर्भर भारत पॅकेजची घोषणा केली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधानांनी २० लाख कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. उद्योग जगतातल्या अनेकांनी या पॅकेजचं स्वागत केलं आहे. यानंतर आता कोट्यवधी रुपयांचं कर्ज बुडवून फरार झालेला उद्योगपती विजय मल्ल्यानंदेखील सरकारचं अभिनंदन केलं आहे. 

सरकारनं माझ्यासारख्या उद्योगपतीकडे दुर्लक्ष का करतंय, असा प्रश्न विजय मल्ल्यानं उपस्थित केला आहे. 'कोविड-१९ चा सामना करण्यासाठी जाहीर केलेल्या पॅकेजबद्दल सरकारचं अभिनंदन. सरकार कितीही नोटा छापू शकतं. पण सरकारी बँकांकडून घेतलेलं १०० टक्के कर्ज परत करण्याची तयारी दर्शवणाऱ्या व्यक्तीकडे सरकार दुर्लक्ष का करतंय? कृपया मी देत असलेला पैसा विनाअट घ्या आणि हे सगळं संपवा,' असं मल्ल्यानं ट्विटमध्ये म्हटलं आहे.



विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यात आलं असून त्याच्यावर सरकारी बँकांचे जवळपास ९ हजार कोटी रुपये बुडवल्याचा आरोप आहे. भारतातून पळून गेलेला मल्ल्या बऱ्याच महिन्यांपासून लंडनमध्ये वास्तव्यास आहे. लंडनमधल्या न्यायालयानं मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा आदेश दिला. त्या निकालाला मल्ल्यानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं. त्याआधी मल्ल्यानं पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र त्यानं जामीन मिळवला. 

Web Title: Please take my money unconditionally and close Vijay Mallya to Indian government kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.